शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्ण दगावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:26 IST

स्वाईन फ्लूचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून, सोमवारी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. अशोक नाथा शेंडे (५०) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्दे साथ : जळगाव फेरण गावातील घरांची तपासणी

औरंगाबाद /करमाड : स्वाईन फ्लूचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून, सोमवारी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. अशोक नाथा शेंडे (५०) असे मृताचे नाव आहे.औरंगाबाद तालुक्यातील जळगाव फेरण येथील शेतकरी अशोक शेंडे हे सात दिवसांपासून थंडीतापाने आजारी होते. शेकटा, जालना येथे खाजगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरूअसताना सोमवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले,२ भाऊ,आई असा परिवार आहे. ते बांबू खरेदीसाठी मलकापूर, अमरावती येथे गेले होते. त्यानंतर ते आजारी पडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.घरांची तपासणीलाडसावंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान राऊत म्हणाले की, अशोक शेंडे यांनी आमच्याकडे आजाराच्या वेळी तपासणी केल्याची नोंद नाही. त्यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आली असून, सोमवारी फेरण जळगाव येथे १५० घरांची तपासणी केली. यावेळी २ तापाचे व २ सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.घाटीत एक रुग्णशहरात गेल्या आठवडाभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला घाटीत एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. घाटीत टॅमी फ्लूचा पुरेसा साठा असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यू