बीड : जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याने नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. दुपारच्या वेळी जनजीवन विस्कळीत होत आहे.एप्रिल महिन्याची नुकतीच सुरुवात होत नाही तोच, शनिवार-रविवारी ४१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पाटोदा तालुक्यात एकाचा तीन दिवसांपूर्वीच उष्माघाताने बळी गेला आहे. त्यामुळे नागरिक काळजी घेत आहेत. सकाळी ९ वाजेपासूनच ऊन तळपू लागते. ही तीव्रता सायंकाळी ६ वाजेपर्यंत कायम राहते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे. अनेक जण उन्हाच्या वेळा टाळून घराबाहेर पडतात. वाढत्या दाहकतेमुळे चष्मे, रूमाल, गमछे यासह फ्रीज, कुलर, वातानुकूलन यंत्रे यांना मागणी आहे. रात्रीच्या वेळीही धग जाणवत असल्यामुळे अनेक जण घराचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवून झोपणे पसंत करीत आहेत. (प्रतिनिधी)
दाहकतेची चाळिशी
By admin | Updated: April 2, 2017 23:32 IST