शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घोषित-अघोषित भारनियमनाने फोडला औरंगाबादकरांना घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 18:44 IST

वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे.

औरंगाबाद : उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अंगाची काहीली होत असतानाच विजेच्या घोषित-अघोषित भारनियमनाने शहरवासीयांना चांगलाच घाम फोडला आहे. औरंगाबाद शहर मंडलातील ८८ पैकी २९ फिडर हे जास्त थकबाकी व वीज वितरण हानीचे आहेत. तिथे सव्वाचार ते पाच तास, तर इतर फिडरवर दीड ते चार तास दोन टप्प्यांत नियोजित लोडशेडिंगचे महावितरणचे परिपत्रक आहे.

विजेची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तूट निर्माण झाली आहे. महावितरणकडून राज्यातील २ कोटी ८० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे. जिल्ह्यात सुमारे ११ कोटी युनिटची मागणी वाढली आहे. सुमारे २,३०० ते २,५०० मेगावॅट विजेची तूट असून, शहरात दीड ते पाच तासांचे भारनियमन होत आहे. शुक्रवारी (दि. २२) महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. विजेच्या उपलब्धतेनुसार मागणी व पुरवठा यातील तूट कमी झाल्यास भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी होईल, असे महावितरणकडून कळविण्यात आले.

बिल भरल्यास कमी होऊ शकते लोडशेडिंगवीजबिल भरल्यास फिडरची कॅटॅगिरी बदलेल. त्यानुसार लोडशेडिंगही कमी होईल. जिल्ह्यात सर्वाधिक वीज गळती आणि बिलांचा भरणा कमी असलेले जी १, जी २, जी ३ हे फिडर आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

वीज तुटीमुळे अतिरिक्त वीज उपलब्ध करणे आणि मागणी कमी करण्याच्या उपाययोजनांवर अवलंबून सध्याच्या भारनियमनाचे नियोजन केले. विजेच्या तुटीमुळे इमर्जन्सी लोडशेडिंग करावे लागते. सध्या पुरवठा वाढण्याची शक्यता दिसत नाही.- डाॅ. मंगेश गोंदावले, सहव्यवस्थापकीय सहसंचालक, महावितरण प्रादेशिक कार्यालय

वीजग्राहक म्हणतात...दिलेल्या वेळापत्रकानुसार वीज गेली, तर कामांचे नियोजन होऊ शकते. उकाड्यात दुपारी आणि रात्रीचा वीज पुरवठा खंडित नकोच. पाणी येते त्या वेळेतही वीज जाऊ नये.- श्रीकांत बोरुडे, वीजग्राहक, चिकलठाणा

केव्हाही वीज जात आहे. त्यामुळे कामेही होत नाहीत. शिवाय घरात उकाड्यामुळे थांबणेही शक्य होत नाही. वृद्धांसह लहान मुलांचे तर खूप हाल होत आहेत.- देवकी जाधव, वीजग्राहक, अविष्कार कॉलनी

सध्या उपवास सुरू आहेत. रात्री १० ते १ वाजेपर्यंत वीज नव्हती. दुपारीसुद्धा तीन तास वीज खंडित होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.- सय्यद तारीक, वीजग्राहक, जटवाडा

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद