औरंगाबाद : औरंगाबादचा शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण याने केलेल्या नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर सेक्रेटरी इलेव्हन संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे सुरू असलेल्या सीनिअर सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या पीवायसी संघावर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला.स्वप्नील चव्हाण याने केलेल्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर सेक्रेटरी इलेव्हन संघाने पीवायसी संघाविरुद्ध ४७.२ षटकांत सर्वबाद २६७ धावा फटकावल्या. स्वप्नील चव्हाण याने अवघ्या १३२ चेंडूंतच १४ खणखणीत चौकार आणि ५ टोलेजंग षटकारांसह नाबाद १३५ धावांची खेळी सजवली. स्वप्नीलला विशाल कुकडे याने २१, मनीष निगडे याने २३ आणि तरणजितसिंग धिल्लन याने ३३ धावा काढून साथ दिली. पीवायसीकडून दिव्यांग हिंगणेकर आणि संजय परदेशी यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पीवायसी संघाने कडवी झुंज दिली; परंतु अखेरचा त्यांचा संघ ४९.२ षटकांत २६६ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून अनुज छाजेडने ४८, संग्राम भालेकरने ३६ धावा केल्या. सेक्रेटरी इलेव्हनकडून अक्षय पालकर व प्रशांत कोर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. शुभम चाटे, स्वप्नील गंभीरे, तरणजितसिंग धिल्लन व मानसिंग निगडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकसेक्रेटरी इलेव्हन : ४७.२ षटकांत सर्वबाद २६७.(स्वप्नील चव्हाण नाबाद १३५, तरणजितसिंग धिल्लन ३३, मानसिंग निगडे २३, विशाल कुकडे २१. दिव्यांग हिंगणेकर ४/५०, संजय परदेशी ४/४९).पीवायसी : ४९.२ षटकांत सर्वबाद २६६. (अनुज छाजेड ४८, संग्राम भालेकर ३६. अक्षय पालकर २/३३, प्रशांत कोरे २/३९, शुभम चाटे १/३८, स्वप्नील गंभीरे १/३५, तरणजितसिंग ढिल्लन १/३८)
स्वप्नीलच्या शानदार शतकी खेळीने सेक्रेटरी इलेव्हन विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:15 IST
औरंगाबादचा शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण याने केलेल्या नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर सेक्रेटरी इलेव्हन संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे सुरू असलेल्या सीनिअर सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या पीवायसी संघावर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला.
स्वप्नीलच्या शानदार शतकी खेळीने सेक्रेटरी इलेव्हन विजयी
ठळक मुद्देएमसीए सुपर लीग : पीवायसी संघावर चित्तथरारक विजय