नवीन नांदेड : पुणेगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात २९ मार्च रोजी एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले आहे़ त्याच्या नाका- तोंडातून रक्त तसेच गळ्यावरही मारहाणीच्या खुणा असल्याने त्याची हत्या की आत्महत्या, हा प्रश्न पुढे आला आहे़ नांदेड ग्रामीण पोलिसांनी या संशयास्पद प्रकरणाचा तपास सुरू केला आहे़ पुणेगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात एका व्यक्तीचे प्रेत तरंगत असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली़ ही माहिती समजताच इतवारा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर, पो. नि. गजानन सैदाने, सपोनि. अशोक बेले, पोउपनि. परशुराम मराडे, पो. हेकॉ. दिगांबर डिडुळे आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पुणेगावचे पोलिस पाटील बालाजी पुयड यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे़ (वार्ताहर)
गोदावरी पात्रात अनोळखी व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू
By admin | Updated: March 29, 2016 23:53 IST