शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बिंदुनामावलीच्या पडताळणीवरच संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:14 IST

प्राथमिक शिक्षण विभागातील ज्या कर्मचाºयांनी चुकीची बिंदुनामावली तयार केली, मागासवर्गीय कक्षाकडून ती प्रमाणित करून घेतली, आता प्रशासनाने पुन्हा त्याच कर्मचाºयांकडे तीच बिंदुनामावली पडताळणीसाठी दिली आहे, त्यामुळे सत्य समोर येईलच कशावरून, असा प्रश्न खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्राथमिक शिक्षण विभागातील ज्या कर्मचाºयांनी चुकीची बिंदुनामावली तयार केली, मागासवर्गीय कक्षाकडून ती प्रमाणित करून घेतली, आता प्रशासनाने पुन्हा त्याच कर्मचाºयांकडे तीच बिंदुनामावली पडताळणीसाठी दिली आहे, त्यामुळे सत्य समोर येईलच कशावरून, असा प्रश्न खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने उपस्थित केला आहे.जि.प. शिक्षण विभागाने विभागीय आयुक्तालयातील मागासवर्गीय कक्षाकडून २ मे २०१६ रोजी प्रमाणित करून घेतलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बिंदुनामावलीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये खुल्या प्रवर्गातील तब्बल १६६ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. यासंबंधी आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांच्या हाती अनेक पुरावे लागले असून, सदरील शिक्षकांनी यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे जाब विचारला. सातत्याने पाठपुरावाही केला; पण प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अन्यायग्रस्त खुल्या प्रवर्गातील शिक्षकांनी एकत्र येऊन ‘खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ’ या नावे संघटना स्थापन केली. या संघटनेमार्फत ग्रामविकास विभागाकडे तक्रार करण्यात आली. ग्रामविकास विभागाने तक्रारीची ताबडतोब दखल घेतली व एकट्या औरंगाबादच नव्हे, तर राज्यातील परभणी, नांदेड, लातूर, बीड, सोलापूर, यवतमाळ, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदुनामावलीची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले.ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत गेल्या आठ दिवसांपासून शिक्षकांची बिंदुनामावली तपासली जात आहे. तपासणी अंतिम टप्प्यात आली असून, संघटनेने केलेल्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे तपासणी पथकातील कर्मचारी सांगत आहेत. पूर्वी ज्या कर्मचाºयांनी बिंदुनामावलीची मोडतोड केली, आताही तेच कर्मचारी बिंदुनामावलीची तपासणी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे कर्मचारी आपली चूक उघड करतील कशावरून, हा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाºयांना सतावत आहे.या मुद्यांची पडताळणी कोण करणारसन २००५ च्या प्रमाणित बिंदुनामावलीमध्ये अनेक शिक्षक मागास प्रवर्गावर आहेत, तर तेच शिक्षक सन २०१६ च्या बिंदुनामावलीमध्ये खुल्या प्रवर्गात दाखविण्यात आलेले आहेत. बिंदुनामावली अद्ययावत करताना मयत, तसेच सेवानिवृत्त शिक्षकांची नावे वगळलेली नाहीत. आंतरजिल्हा बदलीने येथून गेलेल्या खुल्या प्रवर्गातील ५७ शिक्षकांची नावेही वगळण्याची तसदी घेण्यात आलेली नाही.जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दाखविण्यात आले आहे. शिक्षक नियुक्तीचे पुरावे सापडत नाहीत म्हणून अनेक शिक्षक खुल्या प्रवर्गातच दाखविलेले आहेत. अनेक शिक्षकांची निवडसूचीच शिक्षण विभागाकडे नाही. मग, शिक्षण विभागाने बिंदुनामावली कोणत्या आधारे तयार केली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. समांतर आरक्षणाद्वारे अन्य प्रवर्गातील निवड केलेल्या शिक्षकांनादेखील सरळ खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवरच दाखविण्यात आलेले आहे.