विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्या वाटप न करता प्राप्त निधीकडे दुर्लक्ष करणाºया गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आतापर्यंत कार्यरत पाच गटशिक्षणाधिकारी आणि तीन वरिष्ठ सहायकांवर चौकशी समितीने ठपका ठेवला होता. तथापि, चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर परवा जि.प. प्रशासनाने एका वरिष्ठ सहायकाला निलंबित केले आहे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकडे दुर्लक्ष, हे प्रकरण ‘लोकमत’ने २४ आॅगस्ट २0१६ रोजी सर्वप्रथम चव्हाट्यावर आणले होते. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी लेखा विभागातील अधिकाºयांची चौकशी समिती नेमली. चौकशी समितीने आठ महिन्यांपूर्वी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तब्बल दहा ते पंधरा दिवस तळ ठोकून या प्रकरणाचे तथ्य शोधले. समितीने आपल्या अहवालात सन २००० ते २०१५ पर्यंत कार्यरत पी.बी. मगर, ए.बी. नळदुर्गकर, बी.के. बोर्डे, आर.पी. रगडे (मयत) आणि प्रियाराणी पाटील हे पाच गटशिक्षणाधिकारी आणि अवचित गाडेकर, ए.के. भालेराव आणि आर.एम. गायकवाड हे तीन वरिष्ठ सहायक अशा एकूण ८ जणांवर ठपका ठेवला होता. दोषी आठही अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस चौकशी समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांच्याकडे केली होती,
आठ जणांपैकी एका कर्मचाºयाचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:49 IST