शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

निलंबन रद्दचे बोगस आदेश

By admin | Updated: July 18, 2014 01:46 IST

संजय तिपाले , बीड नियमबाह्य पदोन्नत्या, बदल्यांमुळे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेत आता तर चक्क निलंबन रद्दचे आदेशही 'बोगस' निघू लागले आहेत़

संजय तिपाले , बीडनियमबाह्य पदोन्नत्या, बदल्यांमुळे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेत आता तर चक्क निलंबन रद्दचे आदेशही 'बोगस' निघू लागले आहेत़ एका मुख्याध्यापिकेच्या निलंबन रद्द प्रकरणी काढण्यात आलेल्या आदेशातून हे उघड झाले आहे़ एकाच तारखेत निघालेल्या या आदेशाने शिक्षण विभागाने केलेली 'शाळा' चव्हाट्यावर आली आहे़बीड शहरातील श्री चक्रधर शिक्षण व समाज प्रबोधन मंडळ या संस्थेच्या शिवनेरी प्राथमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या ए़ आऱ गजरे यांच्या निलंबनासाठी संस्थेने शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार तत्कालिन शिक्षणाधिकारी (प्रा.) भास्कर देवगुडे यांनी निलंबनास परवानगी दिली होती. या परवानगीच्या आधारावर १९ मे २०१४ रोजी गजरे यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून एस. वाय. डोईफोडे यांना मान्यता देण्यात आली. गजरे यांच्यावर संस्थेने कार्यालयीन कामकाजात नियमबाह्यता व आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता़दरम्यान, निलंबनाची कारवाई झाल्यानंतर मुख्याध्यापिका गजरे यांनी शिक्षणाधिकारी (प्रा.) देवगुडे यांना लेखी पत्र देऊन आक्षेप नोंदविला. त्यानंतर २७ जून रोजी देवगुडे यांच्या स्वाक्षरीने दोन आदेश निघाले. त्यानुसार ए. आर. गजरे यांच्यावर संस्थेने केलेली कारवाई नियमबाह्य असल्याने ते रद्द करण्यात येत असल्याचे नमूद आहे. त्यापैकी एका आदेशाचा जावक क्र. ५८५९ आहे तर दुसऱ्या आदेशाचा जावक क्र. ६०७९ असा आहे. एकाच दिवसात निलंबन रद्दचे दोन आदेश निघालेच कसे ? याचे कोडे कायम आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकाच दिवसात २२० पत्रे शिक्षण विभागातून कोणाला गेली याचे गौडबंगाल कायम आहे़अन् साक्षात्कार झाला!शिक्षण विभागाने १९ मे २०१४ रोजी एका आदेशाद्वारे शिवनेरी प्रा. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ए. आर. गजरे यांच्या निलंबनास परवानगी दिली. मात्र, त्यानंतर गजरे यांनी आक्षेप नोंदविल्यावर शिक्षण विभागाला साक्षात्कार झाला आणि २७ जून २०१४ रोजी गजरे यांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश संस्था सचिवाला लेखी पत्राद्वारे दिले. विशेष म्हणजे दोन्ही आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्रा.) भास्कर देवगुडे यांच्याच स्वाक्षरीने निघाले. गजरे यांच्यावरील निलंबनाची कारवाई एकतर्फी होती.निलंबनापूर्वी त्यांची चौकशी केली गेली नाही ही चूक लक्षात आल्याने निलंबन रद्दची उपरती झाली, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत देवगुडे यांच्याशी संपर्क झाला नाही.२७ तारखेच्या आदेशात २८ तारखेचा संदर्भ६०७९ असा जावक क्रमांक असलेल्या पत्रावर पाच संदर्भ दिले असून त्यापैकी पाचव्या क्रमांकाचा संदर्भ संस्थेने २८ जून २०१४ रोजी दिलेल्या पत्राचा आहे. २७ तारखेच्या आदेशात २८ तारखेच्या पत्राचा संदर्भ कसा काय असू शकतो? त्यामुळे हा आदेश बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिक्षणाधिकारी म्हणाले, चौकशी सुरुयाबाबत प्रभारी शिक्षणाधिकारी एस. वाय. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, एकाच दिवशी मुख्याध्यापिकेच्या निलंबन रद्दचे दोन आदेश गेले असल्याचे माझ्याही कानावर आले आहे. याची मी चौकशी सुरु केली आहे. आदेश कोणी दिले? याची खातरजमा करुन कारवाई करावी लागेल.