शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारीचे ५७ प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित

By admin | Updated: January 28, 2017 23:43 IST

लातूर ७ गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी़ याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे़

राजकुमार जोंधळे  लातूरजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकूण २४ पोलीस ठाण्यांच्या डायरीवर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ५७ गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी़ याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे़ या प्रस्तावावर अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत़ लातूर जिल्ह्यात एकूण २४ पोलीस ठाणे कार्यरत आहेत़ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ५८ जिल्हा परिषद मतदार संघ आणि ११६ पंचायत समिती मतदार संघ त्याचबरोबर ६ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे़ विविध पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गणेशोत्सव, नवरात्र आणि निवडणूक काळात पोलिसांकडून कार्यवाही केली जाते़ यातून तडीपारीचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठविले जातात़ निवडणूक आणि नवरात्र, गणोशोत्सव काळात या गुन्हेगाराकडून सामाजिक शांतता भाग होण्याचा धोका असतो़ त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून वेळ प्रसंगी कोंबिंग आॅपरेशनही केले जाते़ तर काही गुन्हेंगारावर प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या जातात़ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खास बाब म्हणून तसे प्रस्ताव त्या-त्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात येतात़ गेल्या तीन वर्षांपासून हे प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून सातत्याने दाखल करण्यात आले आहेत़ मात्र या प्रस्तावावर प्रशासनाकडून तातडीने निर्णय घेतला जात नाही़ त्यामुळे गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होत नाही़२०१४ मध्ये पोलीस प्रशासनाकडून ५७ तडीपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते़ यामध्ये एमआयडीसी लातूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ३, निलंगा ३, उदगीर ८ असे एकूण १४ प्रस्ताव नव्याने दाखल करण्यात आले होते़ त्यानंतर २०१५ मध्ये एमआयडीसी लातूर विभागीय अधिकाऱ्यांकडे २४, निलंगा १०, उदगीर ४, औसा-रेणापूर १, अहमदपूर ४ असे ४५ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते़ या दोन्ही वर्षात काही प्रकरणे निकाली काढण्यात आली़ मात्र प्रलंबित प्रस्तावांची संख्या ५७ ही कायमच राहिली़ पुन्हा २०१६ डिसेंबर अखेरपर्यंतच्या ५७ गुन्हेगारांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्याकडे दाखल करण्यात आले होते़ यामध्ये लातूर एमआयडीसी उपविभागातून १७, निलंगा ६, उदगीर १०, औसा- रेणापूर ४, अहमदपूर ४ असे ४५ प्रस्ताव दाखल केले होते़ मात्र हे प्रस्तावही अद्याप निर्णयाअभावी प्रलंबित आहेत़ सातत्याने तीन वर्षांपासून ५७ तडीपारीच्या प्रस्तावावर निर्णय झाला नाही़