शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२४ पानाची सुसाईड नोट लिहून निलंबित अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 15:24 IST

मित्र-मैत्रीण व पोलिसांचा छळ असह्य;

औरंगाबाद : रेशन कार्ड वाटपातील गैरव्यवहारप्रकरणी निलंबित नायब तहसीलदार नामदेव देशटवाड यांच्या २८ वर्षीय मुलाने पोलिसांचा छळ व मित्र - मैत्रिणींकडून सातत्याने होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री १०.३० वाजता ही घटना उघडकीस आली.

साहेबराव नामदेव देशटवाड (रा. मयूरपार्क) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.  पैठणचे पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ, उपनिरीक्षक सागडे, हर्सूल ठाण्याचे निरीक्षक इंगोले, तहसीलदार किशोर देशमुख व अन्य जबाबदार कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवध व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत साहेबराव याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताचा भाऊ व आईने घेतल्यामुळे घाटीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  मृताच्या भावाने या आशयाची तक्रार आज हर्सूल ठाण्यात दिली आहे. मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, शनिवारी रात्री साहेबरावने साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   वर्षभरापूर्वी साहेबरावचे वडील पैठण येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांच्यावर रेशन कार्ड गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला. सध्या ते निलंबित आहेत. याचा तपास पैठण पोलीस करीत असून, १२ सप्टेंबरला उपनिरीक्षक मुठाळ हे दोन कर्मचाऱ्यांसह देशटवाड यांच्या मयूरपार्क येथील घरी आले व त्यांनी देशटवाड यांची पत्नी व मुलांना अपमानित केले. साहेबरावच्या आईला बाथरूममधून पोलिसांनी  हात धरून ओढले. मुठाळ यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज साहेबरावने १३ व १६ सप्टेंबरला हर्सूल ठाण्यात दिला होता. 

साहेबरावने लिहिली २४ पानांची सुसाईड नोटमयत साहेबराव याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, ती तरुणी तिच्या अन्य मित्रांच्या माध्यमातून साहेबरावला सतत पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करीत होती. या सर्व घटना मयत साहेबरावने एका डायरीमध्ये लिहून ठेवल्या असून, जवळपास २४ पानांची ही सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामध्ये ब्लॅकमेलिंग करणारी मैत्रीण, तिच्या तीन-चार मित्रांची नावे याशिवाय वडिलांसोबत आरोपी असलेल्या तहसीलदाराचे व पैठण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाच्या नावाचा उल्लेख आहे.