शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

‘त्या’ वंचित शेतकऱ्यांचे महावितरणकडून सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:06 IST

लोकमत इफेक्ट : वरिष्ठांकडून दखल; सकाळीच अधिका-यांचे पथक दाखल

लोकमत न्यूज नेटवर्ककेºहाळा : सिल्लोड तालुक्यातील केºहाळा येथील हरण बर्डी शिवारात गेल्या ५० वर्षांपासून वीज पोहोचलीच नसल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी गावातील वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.केºहाळा येथील हरण बर्डी शिवारातील गट नं. १५५ मध्ये नाथाजी फकिरा सुरडकर यांची एकूण चार एकर शेती, तर गट नंबर १५७ मध्ये हुसेन शेख मोहंमद यांची सहा एकर व गट नंबर १५३ मध्ये सुखदेव रामराव बनकर यांची जमीन आहे. हे कुटुंब १९६८ पासून येथे वास्तव्यास आहेत. तब्बल पन्नास वर्षांचा कालखंड या कुटुंबाचा अंधारातच निघून गेला आहे. अनेक शिवारांतही ५० वर्षांपासून उजेड नाही. या शेतवस्तीवरील लोकांनी २०१० मध्ये कोटेशनही भरले आहे; पण महावितरणने दखल घेतलेली नाही. याप्रकरणी लोकमतने शुक्रवारच्या अंकात ‘आमचे सौभाग्य कधी उजळणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून येथील शेतकºयांच्या समस्या उजेडात आणल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत सकाळी ११ वाजताच महावितरणचे सिल्लोड येथील मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार, उप कार्यकारी अभियंता सैवर, उप कार्यकारी अभियंता सुरसे, लाईनमन दत्ता गोराडे, राजेंद्र कुमावत आदींसह त्यांचे पथक हरण बर्डी शिवार गाठून त्यांनी वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण केले. यावेळी अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आमच्या पथकाने वीज नसलेल्या घरांचे सर्वेक्षण केले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.४केºहाळा ग्रामस्थांना विजेच्या समस्या सहन कराव्या लागत आहेत. गेल्या महिन्यात तीन वेळा उच्च दाबाने गावात वीजपुरवठा झाल्याने अनेकांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. हरण बर्डी शिवारात महावितरणचे पथक आल्याचे कळताच उपसरपंच दत्ता कुडके व चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी रोष व्यक्त करीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार यांच्याकडे हट्ट धरला व पथकाला गावातील सर्व फिडरवर घेऊन जात तेथील समस्या निदर्शनास आणून दिल्या.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज