शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

भक्तिमय वातावरणात सूरमयी श्रद्धांजली...

By admin | Updated: March 26, 2016 23:56 IST

औरंगाबाद : लाखोंपेक्षा अधिक महिलांना ‘सखी मंच’ नावाच्या विसाव्याखाली एकत्र आणून त्यांच्यामध्ये नवीन ऊर्मी निर्माण करणाऱ्या सर्वांच्या आदरणीय ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या

औरंगाबाद : लाखोंपेक्षा अधिक महिलांना ‘सखी मंच’ नावाच्या विसाव्याखाली एकत्र आणून त्यांच्यामध्ये नवीन ऊर्मी निर्माण करणाऱ्या सर्वांच्या आदरणीय ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वरज्योती भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात भाभीजींना सूरमयी श्रद्धांजली देण्यात आली. या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन लोकमत सखी मंचच्या वतीने लोकमत भवन येथे करण्यात आले होते.गायक रवींद्र खोमणे यांच्या दमदार स्वरांनी या भजनसंध्येला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे आराध्यदैवत अर्थात पांडुरंगाचे नामस्मरण करून भक्तीचा जागर करण्यात आला. ‘माझे माहेर पंढरी’ हे अनेकांच्या आवडीचे पद रवींद्र खोमणे यांनी मोठ्या ताकदीने सादर केले. गायिका अनघा काळे यांनी त्यांच्या मधुर स्वरांच्या साथीने आई भवानीची आराधना केली. त्यांनी सादर केलेले ‘आई भवानी तुझे लेकरू’ सखींना विशेष आवडून गेले. ग. दि. माडगूळकर यांची रचना आणि सुधीर फडके यांचे संगीत असणाऱ्या ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार’ या सुरेल गाण्यावर सर्व सखींनी भक्तिमय ठेका धरला होता. हे गाणे कुणाल वराळे यांनी सादर केले. अनुप जलोटा यांचे ‘ऐसी लागी लगन’ आणि यासारखी अनेक भक्तिगीते या स्वरज्योती भजनसंध्येत गायली गेली.प्रत्येक भजनाला सखींची मिळणारी दाद क लाकारांचा उत्साह वाढवणारी होती. भजनामागची पार्श्वभूमी, भजनाचा आशय याविषयी सखींना माहिती देत प्रा. महेश अचिंतलवार यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले. मुख्य कलाकारांना राजेश जगधने, राजेंद्र वैराळ, जितेंद्र साळवी, स्टॅलिन शेलार, संदीप यांनी वाद्यांवर साथसंगत केली.