शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
2
निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे...
3
...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
4
"पालिका निवडणुकांसाठी शेअर बाजार बंद ठेवणं खराब नियोजनाचं लक्षण," का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"निवडून येणारे लोकसेवक असावेत, मालक नव्हे!"; संजय शिरसाठ यांचे विरोधकांना खडे बोल
6
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
7
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: "आमचा विजय निश्चित, विरोधी पक्ष उद्या काय सांगायचे? याची प्रॅक्टिस करतायेत" - फडणवीस
8
Fitness Tips: जिमच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या 'या' ७ चुका आजच थांबवा!
9
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
10
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मोदी सरकार देतंय ९० हजारांचे कर्ज; अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
11
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
12
भोपाळमध्ये काळाचा घाला! मकर संक्रांतीच्यानिमित्ताने स्नानासाठी निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
13
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
14
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
15
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
16
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
17
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
18
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
19
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
20
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य... होर्डिंगला स्टील डिझाइन तज्ज्ञांचे नाही! अनुभवी व्हेंडरच उभारतात लोखंडी स्ट्रक्चर

By मुजीब देवणीकर | Updated: May 17, 2024 09:01 IST

अनेक एजन्सीधारक अनुभवी व्हेंडरला होर्डिंग उभारण्याचे काम सोपवितात.

मुजीब देवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : शहरात ४२० पेक्षा अधिक होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यातील बहुतांश होर्डिंग्जचे स्टील डिझाइन तज्ज्ञ अभियंत्यांकडून घेण्यात आलेले नाहीत, अशी  धक्कादायक माहिती समोर आली आहे.  अनेक एजन्सीधारक अनुभवी व्हेंडरला होर्डिंग उभारण्याचे काम सोपवितात. हे अतिशय धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. होर्डिंगची दरवर्षी डागडुजी आवश्यक आहे. ९९ टक्के एजन्सीधारक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वादळवाऱ्यात काही नाजूक होर्डिंग्ज कोसळतात.

घाटकोपरमधील घटनेनंतर धोकादायक होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने होर्डिंग एजन्सीच्या बैठका, स्टेबिलिटी प्रमाणपत्र, स्ट्रक्चरल ऑडिट आदी मुद्द्यांवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

‘लोकमत’ने या विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यास सुरू केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यातील एक म्हणजे अनेक एजन्सीधारक होर्डिंग उभारण्यापूर्वी त्याचे डिझाइन तज्ज्ञ अनुभवी अभियंत्याकडून तयार करून घेत नाहीत. व्हेंडरला संपूर्ण होर्डिंग उभारण्याचे काम देऊन मोकळे होतात. महापालिकेला नंतर कोणत्याही अभियंत्याकडून घेतलेले स्टेबिलिटी सर्टिफिकेट सादर करतात. महापालिकाही डोळे बंद करून कागदपत्रांचा स्वीकार करते. 

डागडुजीकडे होते दुर्लक्ष

होर्डिंग एजन्सीधारक दरवर्षी डागडुजीकडे दुर्लक्ष करतात. संपूर्ण होर्डिंगला पेन्ट करायला हवे. कुठे वेल्डिंग निखळली असेल तर ती दुरुस्त करावी. सिमेंटच्या बेसमेंटजवळ अनेकदा खोदकाम होते. वाहनांचा धक्का लागतो. त्यामुळे होर्डिंगला धोका निर्माण झाला का? या सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने तपासल्या गेल्या पाहिजेत. मात्र, तसे होत नाही. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड या राष्ट्रीयीकृत संस्थेने काही निकष ठरवून दिलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी हवेचा दाब ३९ मीटर पर सेकंदच्या दृष्टीने निकष ठरवून दिले आहेत. तज्ज्ञ अभियंता या निकषानुसार स्टील डिझाइन करतो. डिप्लोमाधारक किंवा अन्य व्यावसायिक हे निकष पाळत नाही.

महापालिकेत स्वतंत्र सेल असावा

होर्डिंगचे डिझाइन तपासणे, त्याला परवानगी देणे, वेळोवेळी तपासणी करणे यासाठी पॅनल तर आहे. मात्र, स्वतंत्र सेल नाही. एका स्वतंत्र सेलमार्फत ही कामे करायला हवी. मनपाच्या वाईट व्यवहारामुळे अनेक तज्ज्ञांनी पॅनलवरून राजीनामा दिलेला आहे.

घाटकोपर येथील घटना दुर्दैवी होती. संबंधितांनी अगोदरच योग्य काळजी घेतली असती तर दुर्घटना टाळता आली असती. शहरातही अनेक होर्डिंग्ज आहेत. नियम आणि काळजी घेतली तर दुर्घटना टाळता येते. - एम.डी. युनूस, ज्येष्ठ वास्तुविशारद