बीड : जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रशासकीय यंत्रणेला लोकसहभागाचा आधाराची गरज होती. पाणीपातळी वाढावी, शिवार जलयुक्त व्हावा म्हणून बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवून दिले. जलयुक्तच्या दुसऱ्या टप्प्यात ताडसोन्ना गावाचा समावेश झाला असला तरी गतवर्षी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नदी खोलीकरणाची कामे झाली होती. अभियानात आपल्या गावाचा समावेश होताच विभागीय आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अभियानातील सर्वच विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ग्रामसभा घेतली. योजनेचे महत्व ग्रामस्थांना सांगून अडी-अडचणी समाजावून घेतल्या. एवढेच नाही, तर कामे दर्जात्मक करण्याच्या दृष्टीने सूचनाही दिल्या होत्या. गावात कृषी विभागाअंतर्गत कंपार्ट बंडिंग, बांधबंदिस्ती, तर जलसंधारण विभागाकडून सिमेंट नाल्यांची कामे झाली आहेत. नाम फाऊंडेशने केल्या खोलीकरणाच्या ठिकाणी बंधारे उभारण्यात आली आहेत. प्रशासकीय यंत्रणेला लोकसहभागाची जोड मिळाल्याने ताडसोन्ना हे टँकरमुक्त झाले आहे. पाणीपातळी वाढल्याने सध्याच्या उन्हाळ्याच्या दाहकतेमध्येही गाव शिवार हिरवागार दिसत आहे. दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावात प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था व लोकसहभागाची जोड त्यामुळे अभियानाचा उद्देश साध्य झाला आहे.पहिल्या टप्प्यातील ८७ कोटी रकमेची कामे लोकसहभागातून झाल्याने प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसहभागामुळे या योजनेचे चळवळीत रूपांतर झाले. (प्रतिनिधी)
‘जलयुक्त’ला आधार लोकसहभागाचा
By admin | Updated: April 10, 2017 23:59 IST