गेवराई : आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज व पुरावा ग्राह्य धरला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी याची मागणी केली जात असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत़ गेवराई तालुक्यातील आधारकार्ड केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़गेल्या तीन वर्षांपासून आधारकार्ड नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे़ आधारकार्ड हा बँक, मोबाईल सीमकार्ड, रहिवासी आदी ठिकाणी पुरावा म्हणून मागितले जात आहे़ यामुळे अनेकांनी आधारकार्डला प्राधान्य दिले होते़ जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाखांच्या जवळपास असून बहुतांश ग्रामीण भागातील लोकांनी आधारकार्ड काढले आहे़ मात्र अनेक ठिकाणी आधारकार्ड काढणे बाकी आहे़ आधारकार्ड नोंदणीसाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यासाठी प्रारंभी ५ संस्थांतर्गत केंद्रे स्थापन करण्यात आली होती़ पैकी तीन संस्थांनी आपले काम बंद केल्यानंतर दोन संस्थांचे काम जिल्ह्यात सुरू होते़ या दोन संस्थांनी तालुक्याच्या ठिकाणी आपले केंद्र स्थापन केले होते़ त्याच ठिकाणी नोंदणी केली जायची़ मात्र आता परिस्थिती बदलली आहे़ आधारकार्ड काढण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या घटली असल्याने या कंपन्यांनी केंद्र बंद केले असल्याची बाब एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितली़आधारकार्ड केंद्र बंद केल्याने अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे़ आधारकार्ड काढणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी अनेक नागरिक, युवक, महिला आधारकार्ड काढणे बाकी आहेत़ अनेक ठिकाणी आधारकार्डची मागणी केली जात असल्याने गेवराई शहरातील नागरिक केंद्रावर गेले असता तेथे हे केंद्र बंद असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे शासनाने आधार केंद्र त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे़विशेष म्हणजे हे आधार नोंदणी केंद्र गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बंद आहे़ अनेक वेळा मागणी करूनही आधार नोंदणी केंद्र बंद आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील व गेवराई शहरातील लोकांना नोंदणीसाठी ज्या ठिकाणी नोंदणी सुरू आहे तेथे जावे लागत आहे़ बीड शहरातील जवळपास सर्व आधार नोंदणी केंद्र बंद करण्यात आलेले आहेत़ यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़ हे आधारकार्ड नोंदणी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़(वार्ताहर)
आधार केंद्र सहा महिन्यांपासून बंद
By admin | Updated: October 29, 2014 00:46 IST