शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

२० लाख नागरिकांना आधार

By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील ० ते ५ बालकांना व ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीस सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यातील ० ते ५ बालकांना व ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीस सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे़ आजपर्यंत नागरिकांच्या आधार नोंदणीचे काम सुरु होते़ यामध्ये २० लाख २६ हजार ४०४ नागरिकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण केले असून, ऊर्वरित अंगणवाडीतील बालक तसेच ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्याही नोंदणीला प्रारंभ करण्यात आला आहे़ लातूर जिल्ह्यात २४ लाख ५४ हजार १९६ लोकसंख्येपैकी २० लाख २६ हजार ४०४ नागरिकांच्या आधार नोंदणीचे काम आजपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे़ तरी यातील १९ लाख २ हजार ३९ नागरिकांना ओळखीचा पुरावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आधार कार्डचे वाटप करण्यात आले आहे़ लातूर जिल्ह्यात ५० आधार नोंदणी संचच्या माध्यमातून आधार नोंदणीचे काम सुरु आहे़ यामध्ये सतत सेवा देणाऱ्या ११ संच सेतू सुविधा केंद्राचाही समावेश आहे़ या आधार नोंदणीच्या कामाला आणखी गती मिळावी, या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाने शाळा व अंगणवाडी स्तरावरही आधार नोंदणीचे काम सुरु केले आहे़ याबाबत दहाही तालुक्यांतील तहसीलदारांना आदेश कार्यान्वित केले असून, सर्व विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, बीएलओ, लाईनमन, मुख्याध्यापक यांना संबंधित योजनेतील लाभार्थ्यांचे आधार क्रमांक व आधार नोंदणी क्रमांक संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्यामुळे सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांच्याही आधार नोंदणीला गती देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)