शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

महाराष्ट्राने उन्हाळ्यात फस्त केले २ हजार ५०० कोटींचे आइस्क्रीम, कोणते शहर प्रथम क्रमांकावर?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 12, 2024 16:55 IST

आइस्क्रीम उद्योगासाठी उन्हाळा राहिला ‘सुपर कूल’

छत्रपती संभाजीनगर : यंदाचा उन्हाळा सर्वांत कठीण राहिला... सरासरी पारा ४० ते ४५ अंश दरम्यान जाऊन पोहोचला होता... प्रचंड उकाड्याने जनजीवनही प्रभावित झाले होते... विविध स्वादिष्ट आइस्क्रीमचा आस्वाद घेत शरीर ‘थंडा-थंड कूल कूल’ ठेवले जात होते. उष्णता जेवढी जास्त ते वातावरण आइस्क्रीम उद्योगासाठी ‘सुपर कूल’ ठरते... यामुळेच, मागील चार महिन्यांत महाराष्ट्रात आइस्क्रीम विक्रीत तब्बल २५०० कोटींची उलाढाल झाली. एवढी उलाढाल आजपर्यंतचा उच्चांक मानली जात आहे.

आइस्क्रीम आवडत नाही, असे म्हणणारे लोक खूप दुर्मीळ असतील. आबालवृद्ध आइस्क्रीम दिसले की ते कधी एकदा फस्त करू असेच वाटत असते. जेवढा उन्हाळा कडक, तेवढी आइस्क्रीमची विक्री जास्त हे उद्योगातील गणित ठरलेले आहे. यंदा तसेच घडले. कोरोना काळात आइस्क्रीम उद्योगाला मोठा फटका बसला होता. मात्र, ते नुकसान भरून काढत हा उद्योग ‘नफ्यात’ आला आहे.

आइस्क्रीम उद्योगातील राज्यातील उलाढालीची वाढती आकडेवारीफेब्रुवारी ते मे महिनावर्ष             उलाढाल२०२२- १२०० कोटी२०२३- १५०० कोटी२०२४- २५०० कोटी

हजार कोटीने उलाढाल वाढलीयंदाचा उन्हाळा सर्वाधिक दाहक ठरला. राज्यातील तापमान ४० ते ४५ अंश दरम्यान राहिले. याचा फायदा आइस्क्रीम उद्योगाला झाला. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत २५०० कोटींची उलाढाल झाली, जी मागील वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.

कोरोना काळात एक हजार कोटींचा फटकामहाराष्ट्रातील आइस्क्रीम उद्योगाला वर्ष २०२१ मध्ये कोरोनामुळे सुमारे ८०० ते एक हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते.

राज्यात किती आइस्क्रीम उद्योगमहाराष्ट्र राज्यात आजघडीला लहान-मोठे आइस्क्रीमच्या ३५० कंपन्या आहेत. त्यांची उलाढाल ५० लाखांपासून कोट्यवधीपर्यंतची आहे.

आइस्क्रीम विक्रीत पुणे नंबर वनराज्यात सर्वाधिक आइस्क्रीम पुण्यात विक्री होते. त्यापाठोपाठ मुंबई, नागपूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगरचा नंबर लागतो.

वार्षिक उलाढाल तीन हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची आशापूर्वी हंगामातच आइस्क्रीम खाल्ले जात होते, पण आता वर्षभर आइस्क्रीमची विक्री होते. हंगामात राज्यात २५०० कोटींची उलाढाल झाली आहे. संपूर्ण वर्षभरात तीन हजार कोटींपर्यंत आइस्क्रीमची उलाढाल पोहोचेल. राज्यात आइस्क्रीमचे उत्पादन होते, याशिवाय गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातूनही आइस्क्रीम विक्रीला येत आहे. दुधापासून आइस्क्रीम बनत असल्याने आइस्क्रीम उद्योगावर १८ टक्के लागणारा जीएसटी कमी करावा, अशी मागणी आहे.अनिल पाटोदी- अध्यक्ष, आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार