शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

सुपर..! जगभरापेक्षा छत्रपती संभाजीनगरात कॅन्सरला हरविणारी बालके जास्त

By संतोष हिरेमठ | Updated: February 15, 2024 19:17 IST

मृत्यूचे प्रमाण अगदी कमी : कर्करोगावर मात करून सुखरूप राहणाऱ्या बालकांचे प्रमाण ९२ टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगर : जगभरात कॅन्सरला सामाेरे जाणाऱ्या बालकांचे जगण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे. मात्र, हेच प्रमाण शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात ९२ टक्के आहे. म्हणजे कॅन्सरला सामोरी जाणारी ९२ टक्के बालके या महाभयंकर आजाराचा पराभव करून सर्वसामान्यांप्रमाणे जगत आहेत.

दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी जागतिक बाल कर्करोग दिन पाळण्यात येतो. यानिमित्त बाल कर्करोग याविषयी जनजागृती केली जाते. काही वर्षांपासून बाल कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तंबाखू, सिगारेटमुळे मोठ्यांना कॅन्सर होतो. पण, मुलांना ही शिक्षा का, असा प्रश्न बाल मनाला पडतो.

मुलांमध्ये कोणता कॅन्सर सर्वाधिक?मुलांमध्ये रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. मेंदू, किडनी, लिव्हर, डोळे, हाडांचा देखील कॅन्सर आढळतो. अनुवांशिकता, पेशींमध्ये होणारे जनुकीय बदल, जंतुनाशके, कीटकनाशके, रसायने यांचा वाढलेला वापर, काही जन्मजात आजार ही मुलांमधील कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत.

तीन वर्षांत किती मुलांना कॅन्सर?गेल्या तीन वर्षांत नवीन ४६१ बाल कर्करोगी शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल झाले. एका ६ महिन्यांच्या मुलीला किडनीच्या कॅन्सरचे निदान झाले. चौथ्या स्टेजमधील या चिमुकलीची प्रकृती स्थिर आहे.

शासकीय कर्करोग रुग्णालयातील बाल कर्करोग रुग्णांची स्थितीवर्ष - ओपीडी - आयपीडी - नवीन बालरुग्ण- मृत्यू- कॅन्सरवर मात करणारे२०२१-३,५८१-१,८७०-१४४-१०-९३ टक्के२०२२-३,७११-१,९३०-१५५-११-९२.५ टक्के२०२३-३,८२२-२,०२१-१६२-१२-९२ टक्के

लवकर निदान महत्त्वाचे१८ वर्षांखालील मुलांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, ८० टक्के बाल कर्करोग रुग्ण उपचाराने बरे होतात. त्यासाठी लवकर निदान व उपचार आवश्यक आहेत. अगदी हसतखेळत या गंभीर आजारावर उपचार शक्य आहेत. उपचार सुरू असताना शहरात राहण्याची मोफत सुविधाही पडेगाव येथे उपलब्ध आहे. बालकांच्या उपचारासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि दाते देखील खंबीरपणे उभे राहतात.- डाॅ. तुषार इधाटे, बाल रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञ.

सर्वांच्या प्रयत्नांतून यशजगभरात बाल कर्करोगाच्या रुग्णांचे जिवंत राहण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे. मात्र, शासकीय कर्करोग रुग्णालयातील बाल कर्करोग विभागात हे प्रमाण ९२ ते ९३ टक्के आहे. याचा आनंद आहे. डीएम बाल कर्करोग शास्त्र या अतिविशेषोपचार अभ्यासक्रमासाठी दाखल झालेले विद्यार्थी, सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून हे शक्य झाले. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य. अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले उपचार, सुविधा देत आहेत. डाॅ. कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालय काम करीत आहे.- डाॅ. आदिती लिंगायत, बाल कर्करोग विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.

टॅग्स :cancerकर्करोगAurangabadऔरंगाबाद