शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam: दोन वेळा थोडक्यात हुलकावणी; तिसऱ्या प्रयत्नात राज्यात पहिला

By राम शिनगारे | Updated: July 4, 2023 21:38 IST

2020 साली झालेल्या MPSC PSI परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा सुनील खचकड राज्यात प्रथम

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२० मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर केला. या निकालात छत्रपती संभाजीनगरात पाच वर्षांपासून तयारी करीत असलेला वाशिम जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील तरुण सुनील भगवान खचकड याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या निकालानंतर सुनीलच्या मित्रांनी औरंगपुरा परिसरात एकच जल्लोष साजरा केला.

एमपीएससी आयोगाने पीएसआय पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. यात ५८३ युवकांची निवड केली. सुनील खचकड हा पहिला आला. सुनीलने शहरातील औरंगपुरा भागात पाच वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्यासुनीलचे वडील शेतकरी आहेत. त्याने कला शाखेत पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता.

२०१८, २०१९ साली झालेल्या पीएसआय पदाच्या परीक्षेत थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. मात्र, त्याने तिसऱ्या प्रयत्नात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. निकाल जाहीर झाला तेव्हा सुनील गावी गेलेला असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत मित्रांनी जल्लोष साजरा केला. सुनील याला एक भाऊ असून तो सुद्धा स्पर्धा परीक्षेचीच तयारी करीत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

परीक्षेच्या ५४० पैकी ४२७ गुण

सुनील याने पीएसआय पदासाठीच्या परीक्षेत एकुण ५४० गुणांपैकी ४२७ गुण प्राप्त झाले आहेत. त्याला लेखी परीक्षेत ४०० पैकी ३१३ गुण, शारीरिकचाचणी परीक्षेत १०० पैकी ८७ गुण आणि मुलाखतीत ४० पैकी २७ गुण मिळाले आहेत.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAurangabadऔरंगाबाद