शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निमशिक्षकांची पुन्हा पत्रावर बोळवण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 00:08 IST

उस्मानाबाद : निमशिक्षकांच्या नियुक्त्यांचे भिजत घोंगडे मागील चार ते पाच वर्षांपासून कायम आहे. वेळोवेळी आंदोलने केली जातात. पुढाऱ्यांच्या मध्यस्तीने ती सोडविली जातात

उस्मानाबाद : निमशिक्षकांच्या नियुक्त्यांचे भिजत घोंगडे मागील चार ते पाच वर्षांपासून कायम आहे. वेळोवेळी आंदोलने केली जातात. पुढाऱ्यांच्या मध्यस्तीने ती सोडविली जातात. प्रत्येकवेळी दहा किंवा पंधरा दिवसांत नियुक्ती देऊ असे, असे गोलगोल पत्र देऊन बोळवण केली जाते. ४ जुलैपासून ८२ निमशिक्षकांनी सहकुटुंब सुरू केलेल्या उपोषणाचीही तीच गत झाली. आमदार मधुकरराव चव्हाण, अध्यक्ष धीरज पाटील, सुधाकर गुंड यांनी येऊन मध्यस्ती केली. अन् उपोषण मागे घेतले. पुन्हा त्यांना पंधरा दिवसांची डेडलाईन देण्यात आली. त्यामुळे आता तरी शिक्षणाधिकारी ‘डेडलाईन’ पाळणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कार्यमुक्त करण्यात आलेले ८२ आणि पूर्वीचे ४४ अशा १२६ शिक्षकांना पंधरा दिवसांत नियुक्ती देण्यात येईल, असा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. तसे आदेश अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी दिले होते. परंतु, पंधरा नव्हे, वीस दिवसांचा कालावधी लोटला असतानाही अद्याप नियुक्तीची प्रक्रियाही सुरू झालेली नाही. संचमान्यता आल्यानंतर ‘आमच्याकडे जागा रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून आंतरजिल्हा बदलीने शिक्षक घेता येतील’, असा दावा करणारे शिक्षणाधिकारी आता ‘आमच्याकडे अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यामुळे निमशिक्षकांना सामावून घेता येणार नाहीत’, असे सांगू लागले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक आणि रिक्त जागांची नेमकी काय स्थिती आहे? याचाच ताळमेळ शिक्षण विभागाला लागत नाही की का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केल्या जावू लागला आहे. (प्रतिनिधी) ४पदवीधर शिक्षकांच्या जागेवर निमशिक्षकांना नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने तत्कालीन शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांनी मार्गदर्शन मागविले होते. शासनाकडून त्यास नकार देण्यात आलेला आहे. हे सर्व सत्ताधारी, विरोधकांनाही माहीत आहे. असे असतानाही पुन्हा शिक्षणाधिकारी जगताप यांनी शासनाकडे याच अनुषंगाने पत्र पाठविले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग पत्रांचा हा खेळ कशासाठी आणि किती दिवस करणार? असा सवाल उपस्थित केल्या जावू लागला आहे.अनेक शाळांवर सध्या शिक्षक नाहीत. शिक्षणाधिकारी दुसरीकडे शिक्षक अतिरिक्त आहेत, असे सांगताहेत. सत्ताधारीही त्यावर विश्वास ठेवत आहेत. परंतु, कोणीही या प्रश्नाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करीत नाहीत. पंधरा दिवसात नियुक्त्या देण्यात येतील, असे अध्यक्षांनी सभागृहात सांगितले होते. तसे आदेशही दिले. परंतु, जवळपास वीस दिवसांचा कालावधी लोटूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही, असे राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी सांगितले.बीड जिल्हा परिषदअंतर्गतही अतिरिक्त, निमशिक्षकांच्या नियुक्तीचा पेच गंभीर बनला होता. परंतु, तेथील लोकप्रतिनिधींनी मंत्रालस्तरावर प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावला. याच पद्धतीने येथील लोकप्रतिनिधींनीही मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केल्यास हा प्रश्न मागी लागेल, असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.