शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात आरोग्य विभागाने शिबिरे घ्यावीत

By admin | Updated: April 1, 2016 01:00 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळिशी गाठत आहे. कडक उन्हामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत होत आहे. कडक उन्हाळा पाहता

जालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळिशी गाठत आहे. कडक उन्हामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत होत आहे. कडक उन्हाळा पाहता नागरिकांनी आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, जनजागृती करावी, असा सूर लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणातून निघाला. उन्हाळ्यात नागरिक आरोग्याबाबत जागरूक असतात का, या विषयावर प्रश्नावली माध्यमातून सर्व्हेक्षण करून नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले. उन्हाळ्यात आरोग्याबाबत नागरिक जागरूक असतात का? यावर ६० टक्के नागरिक आम्ही जागरूक असल्याचे सांगून उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेत असल्याचे सांगतात. २० टक्के नागरिक काळजी घेण्याची गरज नाही असे मत व्यक्त करतात. तर १० टक्के नागरिकांना याबाबत काहीच माहीत नाही. आरोग्य विभाग जनजागृतीसाठी कमी पडतो का? या विषयावर ५५ टक्के नागरिक आरोग्य विभागावर खापर फोडतात. ३० टक्के नागरिक आरोग्य विभागाची बाजू घेत जनजागृती केली जाते असे म्हणतात तर १५ टक्के नागरिक तटस्थ आहेत. उन्हाळमुळे आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी आरोग्य विभागाने शिबिरे घ्यावीत का? या प्रश्नावर ८० टक्के नागरिक होय असे उत्तर देतात. पाच टक्के नागरिकांना शिबीर घेण्याची गरज वाटत नाही तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. (प्रतिनिधी)शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत आहे. यामुळे अबालवृद्धांचे उन्हामुळे हाल होत आहेत. आरोग्य विभागाने उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये अशी जागृती केल्यास नागरिकांना मार्गदर्शन मिळून आरोग्यावर होणारा परिणाम टाळतो. ४आरोग्य विभागाने उष्माघात रोखण्यासाठी काय करावे याचीही जागृती करण्याची मागणी बहुतांश नागरिकांनी केली. बहुसंख्य नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागावर बोट ठेवून शीतपेयांसोबतच बर्फाची तपासणी होत नसल्याचे सांगितले.उन्हाळ्यातील शीतपेयांच्या दर्जाबाबत अन्न व प्रशासन विभाग सतर्क असतो का? या विषयावर १० टक्के नागरिकांना एफडीए सतर्क असते असे मानतात. ८० टक्के नागरिक एफडीए सतर्क नसल्याचे सांगतात. १० टक्के नागरिकांना या बाबत काहीच माहिती नाही.