शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील घरकुलांसाठी साडेअठरा कोटींचा निधी

By admin | Updated: August 24, 2014 02:15 IST

अभिमन्यू कांबळे, परभणी राजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला २०१२-१३, २०१४-१५ या वर्षाकरीता एकूण १८ कोटी ६२ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़

अभिमन्यू कांबळे,  परभणीराजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला २०१२-१३, २०१४-१५ या वर्षाकरीता एकूण १८ कोटी ६२ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ यामध्ये जिल्ह्यातील सहा ‘क’ वर्ग नगरपालिकांमध्येही घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांकरीता राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना राबविण्यात येते़ या योजनेचे नाव बदलण्यात आले असून, आता ही योजना ‘राजीव गांधी घरकूल योजना’ या नावाने ओळखली जाणार आहे़ या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, क वर्ग नगरपालिकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे़ या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी २०१२-१३ या वर्षाकरीता जिल्ह्याला १ हजार ४४० लाभार्थ्याकरीता १३ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ तसेच २०१४-१५ या वर्षाकरीता ४२१ लाभार्थ्यांसाठी ३ कोटी ९९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या अंतर्गत प्रतिघरकूल ९५ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार असून, त्यामध्ये ५ हजार रुपयांचा वाटा लाभार्थ्यांना भरावयाचा आहे़ याशिवाय या योजनेमध्ये पहिल्यांदाच राज्यातील क वर्ग नगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे़ त्यानुसार या नगरपालिका क्षेत्रातील प्रति घरकुलांकरीता १ लाख ५० हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये १ लाख ३८ हजार ७५० रुपये शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे़ तर उर्वरित ११ हजार २५० रुपये लाभार्थ्यांना आपला हिस्सा भरावयाचा आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६८ लाभार्थ्यांकरीता ९४ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ त्यामध्ये जिंतूर शहरातील १४ लाभार्थ्यांकरीता १९ लाख ४२ हजार ५०० रुपये, मानवत शहरातील १० लाभार्थ्याकरीता १३ लाख ८७ हजार ५०० रुपये, पाथरी शहरातील १२ लाभार्थ्याकरीता १६ लाख ६५ हजार रुपये, पूर्णा शहरातील १२ लाभार्थ्याकरीता १६ लाख ६५ हजार रुपये, सेलू शहरातील १५ लाभार्थ्याकरीता २० लाख ८१ हजार २५० रुपये, सोनपेठ शहरातील ५ लाभार्थ्यांकरीता ६ लाख ९३ हजार ७५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नगरपालिका देण्यात येणार आहे़ दरम्यान, राजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला असल्याने अनेक गरजू लाभार्थ्यांच्या घराचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे़ या योजनेची काटेकोर व तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे लाभार्थ्याचे मत आहे़