शिराढोण : सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी होत असलेल्या शारीरिक, मानसिक जाचहटाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास बोरगाव (ता़वाशी) येथे घडलीे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंजकल्ला येथील अभिमान झोंबाडे यांची मुलगी वर्षा हिचा दहा महिन्यापूर्वी बोरगाव येथील राजेंद्र थोरात याच्याशी विवाह झाला होता़ लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा शारीरिक, मानसिक जाचहट सुरू झाला होता़ त्यानंतर तिला ‘तुझ्या बापाने हुंडा दिलेला नाही, आता तुझ्या घरून २५ हजार रूपये घेवून ये’ असे सासूने सांगितले़ परंतू माहेरच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने घरी पैसे कसे मागायचे या विवंचनेत वर्षा हिने शनिवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे अभिमान झोंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल आहे़ झोंबाडे यांच्या फिर्यादीवरून मयतेचा पती राजेंद्र हरिश्चंद्र थोरात, सासू साखरबाई हरिश्चंद्र थोरात, दीर विकास हरिश्चंद्र थोरात, प्रकाश हरिश्चंद्र थोरात, जावू प्रियंका विकास थोरात यांच्याविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ प्रकरणाचा अधिक तपास पोउपनि सुभाष माने हे करीत आहेत़ (वार्ताहर)
छळास कंटाळून महिलेची आत्महत्या
By admin | Updated: May 8, 2016 23:37 IST