निलंगा : निलंगा शहरातील शिवाजी नगर येथील एका विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली़ याबाबत निलंगा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ निलंगा येथील रोहन संजय आर्य हा लातूर येथील बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता़ दिवाळी सुट्ट्यासाठी तो गावाकडे आला होता़ निलंगा येथील शिवाजी नगर येथे तो आपल्या घरी होता़ सोमवारी पहाटे त्याने घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली़ आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही़ त्याच्या प्रेताची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली़ सार्वजनिक स्मशानभूमीत रोहन आर्यच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा, चुलते असा मोठा परिवार आहे़ निलंगा येथील व्यापारी शरद आर्य यांचा तो पुतण्या होत़ (वार्ताहर)
निलंग्यातील एका विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Updated: November 17, 2015 00:30 IST