औरंगाबाद : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ३३८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून तेथे ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. निसर्र्गाच्या लहरीपणामुळे वाया गेलेली पिके, बँकेकडून तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून खते, बियाणांमध्ये गुंतविलेले भांडवल वाया गेले.मुलांचे शिक्षण, लग्न अशा विवंचनेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्यावर्षी ११२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर्षी चार महिन्यांतच शेतकरी आत्महत्यांचा आकडा ३३८ वर पोहोचला आहे. बीडमध्ये सर्वाधिक ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १२९ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ११७ प्रकरणांत अजून मदत देण्याचा काहीही निर्णय झालेला नाही. ७५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.
आत्महत्यांचे सत्र थांबेना
By admin | Updated: April 28, 2016 23:48 IST