शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहित शेतमजूर महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 17:47 IST

लग्नास अवघे पाच महिने झाले होते

वैजापुर  : तालुक्यातील भायगाव येथील एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली. मृत नवविवाहित महिलेचे नाव माया सागर मोरे असे आहे. त्यांच्या लग्नाला पाच महिनेही पूर्ण झाले नसताना या विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.आत्महत्याचे कारण अजुन स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मायाचे एप्रिल महिन्यात तालुक्यातील भायगाव येथील सागर मोरे सोबत लग्न झाले होते.मायाचे माहेर चाळीसगाव असून बुधवारी माया नेहमी प्रमाणे गावातील एका शेतात मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी रोजदारीसाठी गेली होती. सायंकाळी माया घरी परत न आल्याने तिचा रात्री शोध घेण्यात आले.मात्र ती आढळून आली नाही. यानंतर गुरुवारी सकाळी गावातील छगन एकनाथ आंबोरे यांच्या विहिरी जवळ मायाची चप्पल दिसून आली त्यावेळी विहिरित बघितले असता माया पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. त्यामुळे घटनेची माहिती  वैजापुर पोलिसांना देण्यात आली. सपोनी पाटिल, बिट जमादार मोईस बेग, गुणवंत थोरात, लक्ष्मण गवळी या पोलिस कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साह्याने दुपारी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.या घटनेची नोंद वेजापुर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक मोइस बेग करत आहे.