पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसराबाई ढगे यांचा कडेठाण येथील भागचंद ढगे यांच्याशी विवाह झाला होता. परंतु त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन गेला. त्यामुळे त्या आजाराला कंटाळल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या माहेरी म्हणजे नानेगाव येथे राहत असत. शुक्रवारी त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी आसराबाई यांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. इफत सौदागर यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावेळी जमादार सुधाकरराव मोहिते, पोलीस हवालदार पवन चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस जमादार सुधाकरराव मोहिते करीत आहेत.