शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी भरण्यासाठी पैसे नाहीत; लघू उद्योजकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:23 IST

जीएसटी भरणा थकला; कामाचे पैसे मिळत नसल्याने संपविले जीवन

औरंगाबाद : थकलेला जीएसटी भरणा करण्यासाठी पैसे नाहीत, तसेच मोठ्या कारखान्यांकडून संबंधित कामाचे पैसेही मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेले लघुउद्योजक विष्णू रामभाऊ काळवणे (५३) यांनी मंगळवारी सिडको वाळूज महानगरातील साक्षीनगरात राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.काळवणे हे मूळचे फुलशेवरा (ता. गंगापूर) येथील रहिवासी असून, अनेक वर्षांपासून ते पंढरपुरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. चार-पाच महिन्यांपूर्वी काळवणे यांनी सिडको वाळूज महानगरातील साक्षीनगरात भाड्याने घर घेऊन दोघे पती-पत्नी अधूनमधून येथे राहत होते. काळवणे यांच्या मागे पत्नी शांताबाई, मुलगा राहुल, सून असून दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे.काळवणे यांनी काही वर्षांपूर्वी वाळूज एमआयडीसीतील डब्ल्यू-५२ सेक्टरमध्ये गणेश इंडस्ट्रिज नावाने उद्योग सुरू केला होता. त्यात ८ ते १० कामगार आहेत. कारखान्यांच्या स्पेअर पार्टसला बफिंग (पॉलिश) करण्याचे काम ते करीत होते. मात्र संबंधित कामाचे पैसे त्यांना वेळेवर पैसे मिळत नव्हते; परंतु कामगारांना पगार वेळेत द्यावा लागत असल्यामुळे काळवणे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. सहा महिन्यांपासून त्यांचा जीएसटीचा भरणा थकला होता. तो भरणा करण्यासाठी त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. या ताण-तणावातून विष्णू काळवणे यांनी तीन-चार दिवसांपासून शेडमधील काम बंद केले होते, असे समजते.चिठ्ठीतील मजकूरमी विष्णू काळवणे असे लिहून ठेवतो, हे सगळे सत्य आहे. माझ्याकडे कंपनीचे भुगतान, जीएसटीचे ७ महिन्यांचे थकले. कारण मला ६ महिन्यांपासून याचे काम परवडत नव्हते. यावरून या लोकांनी ६ महिन्यांपासून मुद्दामहून त्रास दिला. मी कीर्ती साहेबाला वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला. ते भेटत नसे, समजून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने कधीच ऐकून घेतले नाही. माझ्या काय समस्या होत्या, ऐकल्या नाही. मी दररोज फोन करायचो, फोन उचलला नाही. याने मला ६ वर्षांत भाव वाढवून दिला नाही. मी जीएसटी भरायला तयार होतो, तरी पेमेंट दिले नाही. मानसिक त्रास दिल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. मला ७ महिने खूप त्रास सहन करावा लागला. माझ्यासोबत हे घडले, कुणासोबत घडू नये. कीर्ती साहेबांनी माझे ऐकले असते तर मी वाचलो असतो.पुण्यातील मुलीला व्हॉट्सअ‍ॅपवर चिठ्ठी पाठवून केली आत्महत्याकाळवणे यांची मुलगी रोशनी जाधव ही पुण्यास वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी तिच्या व्हॉटस् अ‍ॅप नंबरवर त्यांनी एक हस्तलिखित चिठ्ठी पाठविली होती. त्यात काळवणे यांनी जीएसटीचा ७ महिन्यांचा परतावा थकल्याने, तसेच कीर्ती साहेबांकडून पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा मजकूर पाठविला होता. चिठ्ठी वाचल्यानंतर रोशनी हिने तात्काळ आई शांताबाई व भाऊ राहुल यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ साक्षीनगरात जाऊन पाहणी केली असता विष्णू काळवणे घरात साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. नातेवाईकांनी काळवणे यांना बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.स्र

टॅग्स :GSTजीएसटी