शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

कृषी सहाय्यकास मारहाण

By admin | Updated: June 28, 2014 01:18 IST

हिंगोली : गारपिटीचे अनुदान का मिळवून दिले नाही? असे म्हणून काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक प्रकाश त्र्यंबकराव कावरखे (वय ५२) यांना मारहाण केल्याची घटना हिंगोली तहसील कार्यालयात

हिंगोली : गारपिटीचे अनुदान का मिळवून दिले नाही? असे म्हणून काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक प्रकाश त्र्यंबकराव कावरखे (वय ५२) यांना मारहाण केल्याची घटना हिंगोली तहसील कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून १४ आरोपींना अटक केली आहे.तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या कावरखे यांच्याकडे तीन महिन्यांपासून गारपीटसंदर्भाने शासकीय योजनेचे काम सुरू होते. या कामासाठी सिरसम सर्कलमधील एकुण आठ गावे त्यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यापैकी एक असलेल्या हिरडी येथील संजय थोरात याने शुक्रवारी सकाळी १०.४० वाजता कावरखे यांना फोन केला. तुम्ही तहसील कार्यालयात या, तुमच्या सोबत बोलायचे आहे. असे त्याने सांगितले. त्यानंतर सकाळी ११ वाजता कावरखे त्या ठिकाणी पोहोचले असता तहसील कार्यालयात मोठा जमाव दिसून आला. त्यापैकी रमेश थोरात याने आमच्या गावाच्या लोकांचे गारपिटीचे पैसे द्या असे म्हणून तो मोठ्याने ओरडू लागला. त्यावर कावरखे यांनी शेतकऱ्यांचे एकूण क्षेत्रफळ व झालेले नुकसान याचा अंदाज घेतल्यानंतर बनविलेल्या बिलानुसार तहसील कार्यालयातून त्याचे पैसे आले आहेत. गारपिटाच्या अनुदानाची यादी तलाठ्याकडे आहे. त्यात माझी काहीही भूमिका नाही, असे स्पष्ट केले; परंतु जमावातील लोकांनी काहीही ऐकूण न घेता लाथाबुक्क्याने कावरखे यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तहसील कार्यालयातील तलाठी धाबे, कृषी सहाय्यक आर.के जाधव, संजय राठोड, आर. एन. कावरे, विठ्ठल जाधव, प्रकाश पांढरे आदींनी भांडणाची सोडवासोडव करून कावरखे यांना वाचविले.याप्रकरणी कावरखे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३३२, १४३, १४९, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला असून १४ जणांना अटक केली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.यात आरोपी शिवहरी विठ्ठल लांडगे, रामेश्वर अर्जुन काकडे, विश्वनाथ नारायण लांडगे, मोहन यशवंतराव थोरात, किशन मोहन थोरात, देवबा राघोजी पठाडे, रामेश्वर यशवंतराव थोरात, ज्ञानबा लिंबाजी थोरात, दिगंबर दत्तराव लांडगे, पांडुरंग भगवान थोरात, रामेश्वर सीताराम चवरघोडे, गजानन जयवंता चवरघोडे, मारोती दगडू थोरात, निवृत्ती बबन थोरात (सर्व रा. हिरडी) यांचा समावेश आहे.दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने या मारहाणीच्या घटनेचा निषेध करून या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. (प्रतिनिधी)