नळदुर्ग : तालुक्यातील जळकोटवाडी येथील एका १९ वर्षीय युवकाने सैन्यभरतीत अपयश आल्याने स्वत:च्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी दुपारी घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळकोटवाडी येथील योगेश जालिंदर कदम (वय-१९) या युवकाला सैैन्य भरतीत अपयश आले होते़ त्यामुळे निराश झालेल्या योगेश कदम याने शनिवारी दुपारी स्वत:च्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी मच्छिंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अधिक तपास पोना बांगर हे करीत आहेत़ (वार्ताहर)
सैैन्यभरतीत अपयश आल्याने आत्महत्या
By admin | Updated: February 4, 2017 23:49 IST