शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर रेशन दुकानात साखर

By admin | Updated: August 6, 2014 02:18 IST

अनुराग पोवळे , नांदेड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवर तब्बल दीड वर्षानंतर साखर उपलब्ध झाली असून ही साखर दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक आणि

अनुराग पोवळे , नांदेडजिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवर तब्बल दीड वर्षानंतर साखर उपलब्ध झाली असून ही साखर दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे़ खाजगी कारखान्यांकडून साखर मिळण्यास येत असलेल्या अडचणींवर मात करताना वाराणसीच्या एका पुरवठादाराकडून शासनाने ही साखर उपलब्ध करून दिली आहे़ जिल्ह्याला जुलै २०१४ या महिन्यासाठी ४ हजार ६४५ क्विंटल साखर उपलब्ध झाली असून ही साखर तालुका स्तरावरही पोहोचली आहे़ साखर कारखान्यांबाबतचे लेव्हीचे धोरण केंद्र शासनाने बदलल्यानंतर खाजगी साखर कारखान्यांकडून पुरवठा विभागाला साखर उपलब्ध करून दिली जात नव्हती़ कारखान्यांना वारंवार कारवाईचे इशारे दिले गेले़ मात्र त्याकडे कारखान्यांनी दुर्लक्षच केले़ गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यासह संबंध मराठवाड्यात स्वस्त धान्य दुकानातून साखर गायब झाली होती़ परिणामी बीपीएल आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना साखर उपलब्ध झाली नव्हती़ राज्यातील पुरवठादार साखर कारखाने शासनाला आणि साखर संघालाही जुमानत नसल्याने शासनाने साखर नॉमिनीऐवजी एनसीडीइएक्स स्पॉट इक्सचेंज लिमि़ यांच्यामार्फत बेटा इडिबल्स प्रोसेसिंग प्रा़ लि़ वाराणसी या खाजगी पुरवठादाराकडून साखर उपलब्ध करून घेतली आहे़ जिल्ह्यासाठी ४ हजार ६४५ क्ंिवटल साखर उपलब्ध झाली आहे़ त्यात नांदेड तालुक्यासाठी ३७० क्विंटल, हदगाव २७२, किनवट ५५२, भोकर १७०, बिलोली २३०, देगलूर २४६, मुखेड ५५०, कंधार ३४०, लोहा ३८४, अर्धापूर १९०, हिमायतनगर १४०, माहूर २५५, उमरी १७०, धर्माबाद १७०, नायगाव ४१६ आणि मुदखेड तालुक्यासाठी १९० क्विंटल साखर मिळाली असून ही साखर पुरवठादाराकडून तालुकास्तरावर शासकीय गोदामात पोहोचविण्यात आली आहे़साखर लाभार्थ्यांना १३़५० रूपये किलो दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे़ प्रतिमानसी ५०० ग्रॅमप्रमाणे प्रौढ अथवा मूल असा भेदभाव न करता ही साखर दिली जाईल़ सर्व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार योग्य प्रमाणात साखर उपलब्ध होईल याची दक्षता घेण्याचे आदेश तहसीलदारांना पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे़ तसेच जिल्हा तपासणी अधिकारी आणि तालुका तपासणी अधिकाऱ्यांनी नियंत्रित साखरेच्या गैरव्यवहाराबाबत विशेष लक्ष केंद्रित करून स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याचेही आदेश दिले आहेत़