शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

डिलरच्याच घशात जाते साखर

By admin | Updated: August 20, 2014 01:53 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड स्वस्त धान्य दुकानावरील साखर व इतर स्वस्त धान्य गोरगरीबांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाची एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे़ तर हेच धान्य लंपास करणारी

व्यंकटेश वैष्णव , बीडस्वस्त धान्य दुकानावरील साखर व इतर स्वस्त धान्य गोरगरीबांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाची एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे़ तर हेच धान्य लंपास करणारी दुसरी यंत्रणा जिल्ह्यात सक्रीय असल्याने स्वस्त धान्याचा काळा बाजार सर्रास सुरू आहे़ हे वास्तव बीड जिल्ह्यात अनेक वर्षापासून सुरू आहे़ सणाच्या निमित्ताने आलेली साखर मोठ-मोठ्या डिलरच्या घशात घालण्यासाठी नवनविन फंडे राबविले जात असल्याचे सुत्रांची सांगितले़अन्न सुरक्षा योजने अंतर्गत दोन रूपये किलोने गहू व चार रूपये किलोने तांदूळ यासह इतर भरड धान्य गोरगरीब जनतेला स्वस्तात मिळावे यासाठी शासन प्रयत्न करते. पुर्वी आलेली साखर अथवा इतर स्वस्त धान्य डिलर मार्फत वितरित केले जात होते़ मात्र आता स्वस्त धान्य दुकानदारांनी थेट शासकीय गोदामातूनच साखर उचलायची आहे़ यामुळे आलेल्या साखरेचा काळा बाजार करण्याचे विविध फंडे वापरले जात आहेत़ यामध्ये दहा ते पंधरा स्वस्त दुकानदार एकत्र येऊन पुर्वीच्या डिलरकडे जाऊन त्यांना परमीट देत आहेत़ यामुळे गोरगरीबांसाठी आलेले स्वस्त धान्य खुल्या बाजारातील धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या घशात जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीड व परळी सोडता जिल्ह्यातील इतर तालुक्यातील साखरेचे ९० टक्केच्या जवळपास वाटप झालेले आहे. प्रत्यक्ष मात्र बहुतांश गावात साखरेचा पुरवठा झालेला नाही.२०१३ च्या दिवाळीतच आमच्या गावाला साखर आली होती. अशा प्रतिक्रीया ग्रामीण भागातील नागरिकांनी दिल्या. पोळ्याचा सण आवघ्या चार दिवसावर आलेला असताना देखील इतर भरड धान्याचे वाटप झालेले नाही़ यामुळे बीड जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना महागामोलाचे (साखर व इतर भरड धान्य) खरेदी करावे लागणार असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़प्रशासनाने अन्नपुर्णा योजनेचा नुसताच गाजावाजा केला आहे़ अद्याप पर्यंत अन्नपर्णा योजनेचे धान्य गोरगरीबांपर्यंत पोहोचले नसल्याचे सुत्रांनी सांगितले़ यामुळे सणाला लाभधारकांना स्वस्तधान्य मिळेल याची शाश्वती नाही. असे चित्र पहावयास मिळत आहे. आॅगस्ट २०१४ साठी साखरेचे मंजूर नियतन (क्विटंलमध्ये)बीड१८८८गेवराई११२६माजलगाव४३०अंबाजोगाई५१५केज८७८पाटोदा३९८आष्टी७०२धारूर५३१परळी७८३वडवणी३४३शिरूर४४४