शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गटशेतीने बदलले शेतीचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:50 IST

शेतीसाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जालना शेतकरी एका एकरात २२ क्विंटल कापूस उत्पादन घेऊ शकतो, हे दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात गटशेतीचा प्रयोग करणा-या देळेगव्हाण आणि अकोलदेव परिसरातील शेतक-यांनी.

बी.डी. सवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला देव : शेतीसाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जालना शेतकरी एका एकरात २२ क्विंटल कापूस उत्पादन घेऊ शकतो, हे दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात गटशेतीचा प्रयोग करणा-या देळेगव्हाण आणि अकोलदेव परिसरातील शेतक-यांनी.पारंपरिक शेतीला फाटा देऊन जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील शेतक-यांनी गटशेतीची कास धरली आहे. या प्रयोगाची सुरुवात २००० मध्ये झाली. घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील शेतक-यांनी एकत्र येऊन ४५० एकरांत निर्यातक्षम केशर आंबा आणि ६५० हेक्टरवर मोसंबी फळबागेची लागवड केली. हा प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला. जिरडगावचा केशर आंबा थेट परदेशात निर्यात झाला. हा प्रयोग पाहण्यासाठी फळबाग तज्ज्ञ गटशेतीचे प्रवर्तक डॉ. भगवानराव कापसे यांनी अकोलादेव, देळेगव्हाण, नांदखेडा या भागातील शेतक-यांना जिरडगावला नेले. यातून प्रेरणा घेऊन या भागातील शेतक-यांनी अ‍ॅग्रो इंडिया गटशेती संघाची स्थापना केली. त्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतक-यांचे गट तयार करून एका शेतक-याची गटप्रमुख म्हणून नियुक्ती केली. गटशेती करणारे शेतकरी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ लागले. माती परीक्षण करून पिकांना नेमके कोणते घटक, किती प्रमाणात द्यायचे, हवामानातील बदल याचे अचूक मार्गदर्शन शेतक-यांना गटाच्या माध्यमातून मिळू लागले.