शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

बागला ग्रुपची यशोगाथा : मेहनत, सचोटीने नावारूपास आलेले ‘उद्योग तपस्वी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:21 IST

पाच लाख रुपयात सुरू झालेला व्यवसाय ३० वर्षात ९०० कोटीवर पोहोचला आहे.

ठळक मुद्दे जन्मभूमी कोलकाता; कर्मभूमी बनवली औरंगाबाद १२ कंपन्यांची यशस्वी निर्मिती

औरंगाबाद : कोलकाता येथील ज्यूट मिल बंद पडल्यानंतर औरंगाबादचा रस्ता पकडलेल्या राजनारायण बागला यांनी पाच लाख रुपये गुंतवणूक करत औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीची  १० आक्टोबर १९८६ साली स्थापना केली. तेव्हापासून सुरू झालेला उद्योग प्रवास ९०० कोटींवर पोहोचला. यात ऋषी बागला यांची मेहनत,  सचोटी आणि तपश्चर्या आहे.

ऋषि बागला यांचे वडील पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी. कुटुंबाचा ज्यूट मिलचा व्यवसाय होता. हा व्यवसाय बंद पडला. कुटुंब विभक्त झाले. तेव्हा राजनारायण बागला यांनी औरंगाबादेत येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ते औरंगाबादेत दाखल झाले. तेव्हा औरंगाबादेत  बजाज ऑटो कंपनीच्या उद्योग उभारणीस सुरुवात झाली. याच कंपनीच्या दुचाकी वाहनांसाठी अ‍ॅल्युमिलियम डायकास्टचे (मॅग्नटो) उत्पादन सुरू केले. यासाठी त्यांनी औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. ची स्थापना केला. १९८९ साली ऋषी बागला हे कोलकाता येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी संपादन करून औरंगाबादेत दाखल झाले. त्यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांनी कंपनीची सहव्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळली.१९९० साली व्हिडीओकॉन कंपनीच्या वॉशिंग मशीनसाठी शाफ्टचे उत्पादन सुरु केले. १९९३ साली औरंगाबाद मोटर्सची स्थापना करून केनस्टारसाठी छोट्या आकाराच्या कुलरची निर्मिती सुरू केली. २००० साली तैवानच्या लीन ईलक्ट्रिकल्स कंपनीशी करार करून रिले बनवणे सुरू केले. अशा पद्धतीने बागला ग्रुपमध्ये १२ कंपन्यांची उभारणी केली. २००९ साली राजनारायण बागला यांचे निधन झाले. हा ऋषी बागला यांच्यासाठी मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरत त्यांनी उद्योगविस्तार सुरूच ठेवला. पाच लाख रुपयात सुरू झालेला व्यवसाय ३० वर्षात ९०० कोटीवर पोहोचला आहे. औरंगाबाद शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या कलासागर संस्थेच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रात भूमिका बजावणाऱ्या या उद्योगपतीला महाराष्ट्र शासनाने  ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरविले आहे.

चांगला निर्णयऋषी बागला यांच्याकडे भविष्यात या व्यवसायाचा व्याप सांभाळण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे. महिंद्रा ‘सीआयए’ला या उद्योगात रस असल्यामुळे त्यांनी हा प्लॅन विकत घेतला. ते या प्रकल्पात आणखी गुंतवणूक करतील. हा बागला आणि महिंद्रा या दोघांसाठीही चांगला निर्णय आहे.- राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए

औरंगाबादसाठी चांगली बातमी महिंद्रा ‘सीआयए’ने औरंगाबाद इलेक्ट्रिकल कंपनी विकत घेतली, ही औरंगाबादसाठी चांगली बातमी आहे. ‘महिंद्रा’चा हा निर्णय चांगला राहील.- राहुल धूत, व्यवस्थापकीय संचालक, धूत ट्रान्समिशन प्रा. लि.

टॅग्स :businessव्यवसायAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा