शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

विषय समित्यांत आघाड्यांचेच वर्चस्व

By admin | Updated: January 23, 2017 23:36 IST

बीड : विषय समिती निवडीतही काकू-नाना विकास आघाडीचा वरचष्मा कायम राहिला.

बीड : येथील पालिकेमध्ये उपनगराध्यक्ष निवडीत बाजी मारल्यानंतर विषय समिती निवडीतही काकू-नाना विकास आघाडीचा वरचष्मा कायम राहिला. ६ पैकी २ समित्यांमध्ये एमआयएमच्या फुटीर गटाला वाटा देत आघाडीने सहाही समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दुपारी १ वाजता सभागृहात बैठकीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास माने यांनी काम पाहिले. मुख्य अधिकारी प्रशांत खांडकेकर यांची यावेळी उपस्थिती होती. हात उंचावून मतदान करण्याची प्रक्रिया यावेळी पार पडली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मतदानात सहभाग घेतला नाही. पाणीपुरवठा समितीच्या सभापती पदासाठी काकू-नाना आघाडीकडून फारुक पटेल, तर शिवसेनेचे लक्ष्मण विटकर यांनी अर्ज दाखल केले. पटेल यांना ६, तर विटकर यांना स्वत:चे एकमेव मत पडले. बांधकाम विभागाच्या समितीसाठीही विटकर यांनी अर्ज दाखल केला, तर काकू-नाना आघाडीकडून अमर नाईकवाडे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. नाईकवाडे यांना ६, तर विटकर यांना त्यांचे स्वत:चेच मत पडले. त्यामुळे पटेल व नाईकवाडे यांची सभापतीपदी घोषणा करण्यात आली. विटकर यांनी नियोजन व विकास समितीसाठीही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरला. काकू-नाना विकास आघाडीकडून अश्विनी धर्मराज गुंजाळ यांची वर्णी लागली. महिला व बालकल्याण सभापतीपद एमआयएम फुटीर गटाच्या शेख जफर सुलताना बशीर यांच्याकडे गेले, तर उपसभापतीपदी आघाडीच्या सीता मोरे यांची निवड करण्यात आली. एमआयएम फुटीर गटाच्या मोमीन अझरोद्दीन यांची शिक्षण व क्रीडा समितीवर सभापती म्हणून निवड झाली. स्थायी समिती सदस्य म्हणून आघाडीतर्फे रमेश चव्हाण यांची वर्णी लागली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)