वसमत : वसमत येथे उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी गुरूवारी विभागातील तलाठ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनवरच गरमागरम चर्चा झाली. ढालकरी यांनी अनेक तलाठ्यांना याचा जाब विचारला. प्रत्येक तलाठ्याने सज्जावर जावे, शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी जे तलाठी सज्जावर राहणार नाहीत, ज्यांचे मोबाईल स्विच आॅफ असतील. तसेच खासगी कर्मचाऱ्यांकडून जे तलाठी काम करुन घेत असतील. अशांवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले. या बाबत तहसीलदार नरसीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यापुढे सज्जावर तलाठी उपस्थित राहतील, असे आश्वासन दिले. तलाठ्यांना आठ दिवसांचा कार्यक्रमच लेखी स्वरुपात देण्यात येणार असून प्रत्येक सोमवारी सज्जाच्या मुख्यालयी तलाठ्यांनी उपस्थित राहावे व इतर दिवशी सज्जांतर्गत येणाऱ्या इतर गावांना भेटी द्याव्यात, असेही त्यांना सांगण्यात येणार असल्याचे नर्सीकर म्हणाले. (वार्ताहर)
वसमतमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक
By admin | Updated: June 27, 2014 00:16 IST