औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब कलाविश्व कार्यशाळेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पेन स्टँड व फ्लॉवर पॉट कसा तयार करावा, हे शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी माऊंट बोर्ड, ड्रॉर्इंग शीट कट करून विविध प्रकारचे डेकोरेटिव्ह साहित्य वापरून सुंदर असे पेन स्टँड तयार केले. यावेळी राजा रवी वर्मा चित्रकला महाविद्यालयाचे प्रा. उदय भोईर, प्रा. अनिल बावणे, विनोद भोरे, श्रद्धा कन्नम, पल्लवी उफळकर, सिद्धीका सुरपे, मंगेश कानडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ९ मे रोजी सहभागी विद्यार्थ्यांना पेपर बॅग्ज डेकोरेशन शिकविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी येताना कात्री, दोन कलर शीट, लेस, फेव्हिकॉल, डेकोरेशनचे साहित्य, रंग, कलर पेपर्स, स्केल, पेन्सिल, ब्रश आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कॅम्पस क्लब कलाविश्व कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: May 9, 2014 00:07 IST