जालना : भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी एक संकल्प केला होता आणि तो प्रत्यक्षात उतरविला म्हणजे त्यांनी मिसाईल बनविले अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनी संकल्प करावा व स्वत: शोध घेऊन केलेली संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणावी. त्यासाठी शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्यांना वाव द्यावा असे, प्रतिपादन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी रमेश तांगडे यांनी जिल्हास्तरीय विज्ञान व ग्रंथ प्रदर्शन कार्यक्र माप्रसंगी केले.राष्ट्रीय शिक्षा माध्यमिक शिक्षण विभाग व निर्मल क्र ीडा समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित कला विज्ञान व वाणित्य महाविद्यालय बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बदनापूर येथे तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान व ग्रंथ महोत्सव कार्यक्र म आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर तर उदघाटक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पवार व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण अधिकारी रमेश तांगडे ,निरंतर शिक्षण अधिकारी मंगला धुपे , पी. के. शिंदे ,डॉ. देवेश पाथ्रीकर, डॉ. शेख एस एस उपस्थित होते. तांगडे म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनात स्वत: तयार केलेले प्रयोग आवश्यक आहे. केवळ विज्ञान प्रदर्शनात भाग घ्यायचे म्हणून बाजारात तयार असलेले प्रयोग आणून सादर करण्यात काही अर्थ नाही.स्वत: प्रयोग तयार करताना विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढते नुसते पुस्तके पटापट वाचायचे त्यापेक्षा एका दिवसात एक पुस्तक वाचा आणि त्यातून ज्ञान आत्मसात करा. तो खरा ज्ञान त्याच पद्धतीने विज्ञानाबाबत विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सखोल माहिती देऊन काही तरी देशाच्या उपयोगी येईल असा प्रयोग निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन मार्गदर्शन केल्यास अब्दुल कलाम सारखे ग्रामीण भागातील विद्यार्थी घडतील .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर नाजमा खान डॉ.देशमुख गौतम वाव्हळ, कुंडलकर, महेश उंडेगावकर, व्ही. के. सुरासे, डी.डी. खामकर, प्रवीण गडाख, मुस्तफा दांडू , अब्दुल रहेमान, अशोक मुंढे , दिघोळे , फुसे, बोडखे, राहुल हजारे, सुशील लांडे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी संकल्प प्रत्यक्षात साकार करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:26 IST