औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी लोकमत भवन येथे आज खास चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अशा तीन गटांत विभागणी करण्यात आली होती. यामध्ये पहिली ते चौथी या गटास ‘सहल’, पाचवी ते सातवी या गटास ‘धबधबा’ आणि आठवी ते दहावी या गटास ‘किल्ला’ असे विषय देण्यात आले होते. स्पर्धेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांना तीन तासांचा वेळ देण्यात आला होता. सर्व चित्रांचे परीक्षण करण्यात आल्यानंतर तीनही गटांचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राचार्य उदय भोईर, प्रा. अनिल बावणे, प्रसिद्ध चित्रकार राशी पालीवाल यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेस बॉम्बे स्टेशनर्सचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. पहिली ते चौथी गट - प्रथम : यशिका नंदागवारे (पी.एस.बी.ए. स्कूल), द्वितीय : साक्षी बाहेती (टेंडर केअर होम), तृतीय : विधी मंत्री (केम्ब्रिज स्कूल). उत्तेजनार्थ : हरिशंकर व अनन्या आठल्ये (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल) पाचवी ते सातवी गट - प्रथम : साक्षी काकडे (न्यू इंग्लिश स्कूल), द्वितीय : वैष्णवी कुलकर्णी (सेंट लॉरेन्स इंग्लिश स्कूल), तृतीय : राजनंदिनी बाहेती (टेंडर के अर होम). उत्तेजनार्थ : रूपक देशपांडे (संस्कार विद्यालय, जालना), गायत्री टाकळकर (भीमाशंकर स्कूल), मृण्मयी भोईर (सेंट मीरा स्कूल), जान्हवी पाटील (बी.एस.जी.एम. इंग्लिश स्कूल) आठवी ते दहावी गट - प्रथम : गुणाजी पांचाळ (आ.कृ. वाघमारे), द्वितीय : पूजा उखळखर (एस.बी.ओ.ए. पब्लिक स्कूल), तृतीय : विक्रम वाकळे (देवगिरी हायस्कूल). उत्तेजनार्थ : क्षितिज आठल्ये (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल), सुयोग शेजूळ (अनंत भालेराव विद्यामंदिर) सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, कलर बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले. या चित्रकला स्पर्धेनंतर ८ ते १० मेदरम्यान कॅम्पस क्लबतर्फे मुलांसाठी कलाविश्व या तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२१०३०७०० या क्रमाकांवर संपर्क साधावा.
कॅम्पस क्लबच्या चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
By admin | Updated: May 7, 2014 00:29 IST