शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळाला यशाचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:55 IST

अनेकदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात चूक केल्यामुळे किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वाटा चुकलेले अनेक जण आजूबाजूला दिसून येतात. एक चुकीचा निर्णय आयुष्याची वाताहत करू शकतो. त्यामुळे आपल्या करिअरसंबंधी अत्यंत जागरूक राहून विचारपूर्वक निर्णय घ्या, असा हितोपदेश मोटिव्हेशनल स्पीकर विवेक मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना केला आणि यशाचा मंत्र समजावून सांगितला.

ठळक मुद्देकरिअर मार्गदर्शन : लोकमत आणि एसआरएम युनिव्हर्सिटीतर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनेकदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात चूक केल्यामुळे किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वाटा चुकलेले अनेक जण आजूबाजूला दिसून येतात. एक चुकीचा निर्णय आयुष्याची वाताहत करू शकतो. त्यामुळे आपल्या करिअरसंबंधी अत्यंत जागरूक राहून विचारपूर्वक निर्णय घ्या, असा हितोपदेश मोटिव्हेशनल स्पीकर विवेक मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना केला आणि यशाचा मंत्र समजावून सांगितला.चेन्नई येथील एसआरएम युनिव्हर्सिटी आणि लोकमत यांच्यातर्फे शुक्रवारी सायंकाळी लोकमत हॉल येथे ‘यशाचे मंत्र’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोटिव्हेशनल ट्रेनर मेहेत्रे आणि एसआरएम युनिव्हर्सिटीचे आॅटोमोबाईल इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ. एम. लिनस मार्टिन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना मेहेत्रे म्हणाले की, करिअर ठरविताना लोक काय म्हणतात याचा विचार अजिबात करू नका. स्वप्न बघू नका, ध्येय बघा. कारण स्वप्न कधीही पूर्ण होत नाहीत. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. मार्टिन म्हणाले की, उच्चशिक्षणासाठी विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांची निवड करताना त्यांची मान्यता, वैशिष्ट्ये, सुविधा, कॅम्पस आणि प्लेसमेंट, या बाबी विद्यार्थी आणि पालकांनी जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. एसआरएम युनिव्हर्सिटीमध्ये अ‍ॅक्टिव्ह लर्निंग, नॉलेज बेस शिक्षण दिले जाते. येथे नॅनो सायन्स, आॅटोमोटिव्ह आदी शाखांसह सेंटर आॅफ एक्सलन्स आहे. परदेशांतील विद्यापीठांसमवेत एसआरएम विविध शैक्षणिक उपक्रम राबविते. त्यासह विद्यार्थ्यांचे कलागुण, क्रीडा-कौशल्यासह व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

एसआरएम ही वर्ल्डक्लास युनिव्हर्सिटी असून, येथे विद्यार्थ्यांना जे वर्गात शिकविले जाते, ते प्रयोगशाळेत प्रत्यक्षात करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांना योग्य करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत केली जाते.या कार्यशाळेतून उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले असून, आपल्या करिअरकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची संधी मिळाली, अशी प्रांजळ मते अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी व्यक्त केली. मार्गदर्शन सत्रानंतर डॉ. एम. लिनस मार्टिन आणि विवेक मेहेत्रे यांनी विद्यार्थी आणि पालकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे निरसन केले.