लातूर : स्टुडंटस् फेडरेशनच्या वतीने भगतसिंग, सुखदेव, राजगुरु या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजता मशाली रॅली काढण्यात आली. हनुमान चौक, गंजगोलाई मार्गे परत गांधी चौकात ही रॅली मार्गस्थ झाली. प्रा.डॉ. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. रॅलीमध्ये स्टुडंटस् फेडरेशनचे कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गांधी चौकात या मशाल रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीचा प्रारंभ डॉ. विठ्ठल मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वैभव वाघ, बुद्धीसार शिखरे, प्रा.डी.पी. कांबळे, पूजा कांबळे, निखिल जाधव, डॉ. संजय मोरे, यादुल शेख, सुधाकर शिंदे, दत्ता चव्हाण यांची उपस्थिती होती.
स्टुडंटस् फेडरेशनची लातुरात रॅली
By admin | Updated: March 24, 2016 00:45 IST