शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विद्यार्थिनींनी आंदोलन केले, प्रशासनाने लक्ष नाही दिले

By admin | Updated: July 10, 2017 00:32 IST

मारतळा : डोणवाडा ता़ लोहा येथील विद्यार्थिनींनी रस्ता दुरुस्तीसाठी व गावातील वाळूचे अवैध साठे हलवावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन केले़

उत्तम हंबर्डे । लोकमत न्यूज नेटवर्कमारतळा : डोणवाडा ता़ लोहा येथील विद्यार्थिनींनी रस्ता दुरुस्तीसाठी व गावातील वाळूचे अवैध साठे हलवावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन केले़ आंदोलनाची दखल प्रशासन घेऊन प्रशासन कारवाई करेल असे अपेक्षित असताना दुसऱ्या दिवशी गुरुवारी काहीही हालचाली झाल्या नाहीत़ त्यामुळे अजून किती मरणयातना सोसायच्या, असा संतप्त सवाल विद्यार्थिनींनी केला आहे़ डोणवाडा गाव लोहा तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे़ येथील ग्रामस्थांचा शेती हाच मुख्य व्यवसाय़ आपली मुलगी उच्च शिक्षण घ्यावी, चांगल्या हुद्यावर कर्तव्यावर जावी, अशी अपेक्षा प्रत्येक पालकांची असते़ यासाठी ते काहीही करायला तयार असतात़ याला अपवाद डोणवाडावासियपण नाहीत़ गावात पाचवी नंतरचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आठ ते दहा कि़मी़ अंतरावर असलेल्या श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल येथे प्रवेश घेतला़ या दरम्यान मानव विकास बसही होती़ गोदावरी नदीपात्रात जाणारा असल्याने नायगाव तालुक्यातील बरबडा, टाकळी, अंतरगाव येथील वाळू घाटावरून अवैध वाळू उपसा करून मोठमोठी अवजड वाहने रात्रंदिवस या रस्त्यावर सुरू असतात़ त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खराब व खड्ड्यांचा झाला़ परिणामी मानव विकासची बस राज्य परिवहन महामंडळाने बंद केली़ सावित्रीच्या लेकींना यामुळे जंगलातून पायपीट करणे भीतीदायक झाले़ गावकऱ्यांनी संबंधितांना वेळोवेळी निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली़ आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांची एका शिष्टमंडळाने भेट घेऊन रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती़ मात्र प्रशासनासह चिखलीकरांनीही या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी थेट नांदेड गाठून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरही शाळा भरविली़ मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जि़प़चे सीईओ अशोक शिनगारे यांना दिले़ मात्र त्याचीही दखल घेण्यात आली नाही़