मानवत : एसटीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ ११ सप्टेंबर रोजी पाथरी-रामेटाकळी रोडवरील मानवत, वझूर व हमदापूर ही बससेवा रस्ता चांगला नसल्याच्या कारणावरून बंद केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले़ हा आंदोलनाचा भाग जरी सोडला तरी मागील २५ वर्षात मानवत-रामे टाकळी हा रस्ता मधून-मधून खराब होवून वाहतुकीसाठी योग्य राहत नाही़ परिणामी या रस्त्यावर तालुक्याच्या ठिकाणी संपर्क असणारी नागरजवळा, खडकवाडी, किन्होळा, पोहंडूळ, रामे टाकळी, वझूर बु़, वझूर खु, थार, वाघी, कुंभारी, हमदापूर, मंगरूळ, लोहरा, भोसा, सारंगापूर, रामपुरी, हटकरवाडी या गावांना पाथरीहून ये-जा करावी लागते़ मानवत ते पाळोदी व परभणीकडे जाण्यासाठी केकरजवळ्याहून रामे टाकळी, मंगरूळ - पोखर्णी, रामपुरी - हटकरवाडी, मानवत रोड - वालूर या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे़ रस्ते हे विकासासाठी वाहिनीच्या रुपाने काम करतात़ परंतु, या रस्त्याच्या दुर्देशेमुळे शेतकऱ्यांना आपला उत्पादीत माल बाजारपेठेत आणण्यासाठी भाजीपाला पिकविण्यासाठी, विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी खराब झालेल्या रस्त्यामुळे अत्यंत हालापेष्टा सहन कराव्या लागतात़ परंतु, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही़ (वार्ताहर)शैक्षणिक नुकसानखराब झालेल्या रस्त्यांमुळे बस सेवा विस्कळीत होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे पर्यायाने देशाच्या आधारस्तंभाचे अपरिमीत नुकसान होत आहे़ याकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी डोळसपणे पाहून समस्या सोडविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे़
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: September 12, 2014 00:08 IST