शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनी, नोकरदार महिला प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:14 IST

औरंगाबाद : विद्यार्थिनी, नोकरदार महिला प्रवाशांनी उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे मंगळवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर संताप व्यक्त केला. ‘आम्ही अभ्यास करायचा की, रेल्वेचे वेळापत्रक बघायचे?’ असा सवाल महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी उपस्थित केला.

ठळक मुद्दे३१ जानेवारीपर्यंत आंदोलन : अभ्यास करायचा की, रेल्वेचे वेळापत्रक बघायचे?

औरंगाबाद : विद्यार्थिनी, नोकरदार महिला प्रवाशांनी उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे मंगळवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर संताप व्यक्त केला. ‘आम्ही अभ्यास करायचा की, रेल्वेचे वेळापत्रक बघायचे?’ असा सवाल महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी उपस्थित केला.नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त औरंगाबादला दररोजच मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होते. गेल्या काही दिवसांपासून काही रेल्वे वारंवार उशिरा धावत आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून नियमित प्रवास करणाºया मासिक पासधारक प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याविरुद्ध आंदोलन पुकारत प्रवासी सोमवारपासून काळ्या फिती लावून प्रवास करून रेल्वे प्रशासनाचा निषेध करीत आहेत. प्रवाशांचे हे आंदोलन ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. आंदोलनाच्या दुसºया दिवशीही रेल्वेस्टेशनवर प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी केली.महाविद्यालयात वर्ग सुरू असताना रेल्वे कधी येणार, हे पाहण्याची वेळ येते. विस्कळीत वेळापत्रकामुळे वर्ग सोडून रेल्वेस्टेशन गाठावे लागते. रेल्वेस्टेशनला आल्यानंतर रेल्वे वेळेवर येत नाही. वेटिंग रूममध्ये बसता येत नाही. घरी जाण्यास उशीर होतो. पुन्हा सकाळी लवकर उठून रेल्वे पकडावी लागते, असे महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सांगितले. दिवसभर नोकरीच्या ठिकाणी काम केल्यानंतर घरी जाण्यास उशीर होते. त्यामुळे स्वयंपाकासह अन्य घरकामावरही परिणाम होत असल्याचे महिला प्रवाशांनी सांगितले. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवाशांची यावेळी उपस्थिती होती.रेल्वेचा लाईन ब्लॉककोडी ते रंजनी आणि पेरगाव ते परभणी स्टेशनदरम्यान रेल्वेपुलाच्या कामासाठी २ आणि ८ फेब्रुवारीला आरसीसी बॉक्स बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी यादिवशी ३ तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काचीगुडा- मनमाड पॅसेंजर, औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजरच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनpassengerप्रवासीagitationआंदोलन