शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत विद्यार्थ्याची महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी; कॉपी करताना पकडल्याने उचले टोकाचे पाउल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:57 IST

शहरातील एम.आय.टी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देहडको येथे राहणारा सचिन हा एम.आय.टीच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.आज सकाळी दहाच्या सुमारास न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीची परीक्षा सुरु असताना त्याला कॉपी करताना पकडण्यात आले.

औरंगाबाद : शहरातील एम.आय.टी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सचिन सुरेश वाघ असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 

हडको येथे राहणारा सचिन हा एम.आय.टीच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील एसटी महामंडळात चालक असून ते पुणे येथे असतात. सध्या सचिनच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरु आहेत. आज सकाळी दहाच्या सुमारास न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीची परीक्षा सुरु असताना त्याला कॉपी करताना पकडण्यात आले. पर्यवेक्षकाने त्याला प्राचार्याकडे नेले असता तेथे याबाबत प्रक्रिया सुरु असतानाच त्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेतली.  

मित्राला सांगितले आत्महत्या करतोय यानंतर सचिनने त्याचे मित्र शुभम राठोड, आणि सौरभ रणदिवे यांना फोन केला. सौरभ हा एमआयटी महाविद्यालयातच आहे त्याचीसुद्धा परीक्षा सुरु असल्याने त्याने फोन उचला नाही. तर शुभम त्याच्या घरी होता. शुभमला सचिनने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावर शुभने तत्काळ सौरभला फोन लावला. सचिन आणि शुभम दोघांचे फोन आल्याने सौरभने त्याचा फोन उचला. शुभमने त्याला सचिन महाविद्यालयात आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावर सौरभ परीक्षा हॉलमधून धावत बाहेर आला. तर त्याला सचिन समोरच्या इमारतीवर चढलेला दिसला. सौरभने त्याला वाचविण्यासाठी इमारतीकडे धावला मात्र तोपर्यंत सचिनने खाली उडी घेतली होती. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 

त्याला कॉपी करताना पकडले होते सचिन वाघ याला कॉपी करताना पकडले होते. त्याच्या कुटुंबीयांना याची कल्पना देताना घाबरून त्याने उडी घेतली असण्याची शक्यता संचालक मुनीश शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

पहा व्हिडिओ : विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न