शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

शिक्षकाने मारल्याने विद्यार्थ्यास बहिरेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:50 IST

बुन इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकणा-या विद्यार्थ्याला वर्गात गोंधळ करीत असल्याच्या कारणावरून शिक्षकाने त्याच्या कानशिलात लगावली. विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटून त्यास बहिरेपणा आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जटवाडा रोडवरील बुन इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकणाºया विद्यार्थ्याला वर्गात गोंधळ करीत असल्याच्या कारणावरून शिक्षकाने त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेत विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटून त्यास बहिरेपणा आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध २४ सप्टेंबर रोजी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.अब्दुल कदीर अब्दुल जब्बार (४४, रा. फरहतनगर, जटवाडा रोड) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, जटवाडा रोडवरील फरहतनगर येथे बुन इंग्लिश स्कूल आहे. या शाळेत तक्रारदार शेख रफिक शेख अब्दुल रशीद यांचा मुलगा शेख हुजेफ (१५) हा नवव्या वर्गात शिकतो.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आरोपी अब्दुल कदीर हे शिक्षक अरबी भाषा शिकवीत होते. यावेळी काही मुले वर्गात गोंधळ करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अब्दुल कदीर यांनी त्यांच्यापैकी हुजेफला बोलावून सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याच्या कानाखाली मारली. गंभीर दुखापत झाल्याने हुजेफला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास बहिरेपणा आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकाराने शेख रफिक संतप्त झाले. त्यांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे मुलाला बहिरेपणा आल्याची तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक सरवर शेख तपास करीत आहेत.शिक्षिकेने ढकलल्यामुळे विद्यार्थ्याच्या डोक्याला कोचलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इयत्ता चौथीमध्ये शिकणाºया विद्यार्थ्याला शिक्षिकेने हाताला धरून ढकलून दिल्याने दरवाजावर डोके आदळून त्याला कोच पडली. सिडको येथील सेंट झेविअर हायस्कूलमध्ये सोमवारी (दि.२५) ही घटना घडली. याची विचारणा करण्यास गेलेल्या पालकांना शाळेने प्रतिसाद दिला नाही.साई संतोष हुजदार (९) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, सोमवारी दुपारी शाळा सुटल्यावर तो मित्राला पेन मागत होता. यावेळी वर्गात केवळ तीन विद्यार्थी व एक शिक्षिका होत्या. साई पेन मागत असताना त्या शिक्षिकेने त्याच्या डाव्या हाताला धरून बाहेर ढकलले. यामुळे त्याचे डोके दरवाजाच्या हँडलवर जाऊन आदळले. डोक्याला जेथे मार लागला तेथेच शिक्षिकेने पुन्हा चापट मारून त्याला बाहेर काढले. ‘माझ्या वाढदिवसाला गिफ्ट मिळालेला पेन मी मागत होतो तेव्हा टीचरने मला ढकलून दिले. ते कोणाचीच कदर करत नाही,’ असे विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला सांगितले.घरी आल्यावर घाबरलेल्या साईने आईला सर्व प्रकार सांगितला. आईने लगेच वडिलांना फोन करून साईला दवाखान्यात नेले. ‘त्याच्या डोक्यातून रक्त आले तरी शाळेने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. साधा प्रथमोपचारदेखील केला नाहीत. आम्ही कोणाच्या भरोशावर विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे? असा संतापजनक सवाल आई शीतल हुजदार यांनी केला. दुपारी पालक शाळेत आले असता त्यांना दुसºया दिवशी येण्यास सांगितले. तोपर्यंत शाळा प्रशासनाला याबाबत काहीच माहिती नव्हती. ‘शाळेकडून आम्हाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी साधी चौकशीदेखील केली नाही. केवळ ‘उद्या सकाळी येऊन भेटा’ असे शाळेचे सुरक्षारक्षक आणि शिपाई आम्हाला सांगत होते, असे वडील संतोष हुजदार यांनी सांगितले.