शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
6
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
7
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
8
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
9
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
10
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
11
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
12
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
13
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
14
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
15
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
16
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
17
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
18
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
19
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
20
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव

'मूळ हेतूलाच फासला हरताळ'; भरमसाठ शुल्कामुळे खेळाडूंची विभागीय क्रीडा संकुलाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 17:41 IST

खेळाडूंत गुणवत्ता ठासून भरली आहे, अशा खेळाडूंना शासन, संघटना काय सुविधा पुरवतात याकडे मात्र दुर्लक्ष असते.

ठळक मुद्देशुल्कवाढीमुळे विभागीय क्रीडा संकुलातील सुविधांचा पुरेपूर लाभ घेण्यापासून प्रतिभावान खेळाडूंना वंचित  ग्रामीण आणि गरीब कुटुंबातीलच जास्त खेळाडू असतात व त्यांच्यासाठी हा खर्च आवाक्याबाहेरचा

- जयंत कुलकर्णी

औरंगाबाद : मराठवाड्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावे या हेतूने शासनातर्फे २०१० मध्ये विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, खेळाडूूंचा विचार न करता त्यांना प्रति महिना अवाच्या सव्वा शुल्क आकारुन विभागीय क्रीडा संकुल समितीने मूळ उद्देशालाच हरताळ फासला आहे. भरमसाठ शुल्क आकारल्यामुळे चक्क खेळाडूंवरच विभागीय क्रीडा संकुलाकडे पाठ फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामळे प्रशिक्षक, संघटक व पालकांत संताप व्यक्त होत आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा आली की, ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू निर्माण व्हायला हवे, आपला देश खूप मागे अशी नेहमीच चर्चा रंगत असते. मात्र, ज्या खेळाडूंत गुणवत्ता ठासून भरली आहे, अशा खेळाडूंना शासन, संघटना काय सुविधा पुरवतात याकडे मात्र दुर्लक्ष असते. त्यातच शुल्कवाढीमुळे विभागीय क्रीडा संकुलातील सुविधांचा पुरेपूर लाभ घेण्यापासून प्रतिभावान खेळाडूंना वंचित राहावे लागत आहे. नेमबाजीसाठी प्रतिमहिना २ हजार शुल्क तसेच ओळखपत्राचे ३५० रुपये वेगळेच. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील पालकांच्या खिशाला हा खर्च पेलवणारा नाही.  त्यामुळे  संकुलात नेमबाजीचे प्रशिक्षण केंद्र बंद करण्यापासून संघटकांना पर्याय उरला नाही.  बॅडमिंटन, स्क्वॉश व स्नूकरसाठी १५००, क्रिकेटसाठी १ हजार, तर जिम्नॅस्टिक, कबड्डी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, कुस्तीसाठी तायक्वांदोसाठी प्रतिमहिना ७५० रुपये शुल्क कारण्यात आले आहे.  विशेष म्हणजे ॲथलेटिक्स, कबड्डी आणि कुस्ती खेळाचा सराव करणारे हे सर्वसाधारणपणे  ग्रामीण आणि गरीब कुटुंबातीलच जास्त खेळाडू असतात व त्यांच्यासाठी हा खर्च आवाक्याबाहेरचा आहे.

स्पर्धा तरी कशा आयोजित कराव्यात ?खेळाडूंना नुसता सराव करून भागत नाही. त्यांच्या गुणवत्तेचा कस पणाला लागावा यासाठी स्पर्धा हे प्रमुख व्यासपीठ असते. मात्र, विभागीय क्रीडा संकुलात स्पर्धा आयोजित करण्याचे प्रतिदिवसाचे भाडे आवाक्याबाहेरचे आहे.  ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी २५ हजार, बॅडमिंट, स्क्वॅशसाठी ४० हजार ७००, कुस्ती स्पर्धेसाठी १५ हजार ३४०, टेबल टेनिससाठी १३ हजार २२५ आणि तलवारबाजी, जिम्नॅस्टिक, कबड्डी व बॉक्सिंग स्पर्धेसाठी आयोजकांना प्रत्येकी ७ हजार ३४० रुपये दर आहेत.  शिवाय विद्युत बिल आणि तेथे खेळाडूंच्या राहण्यासाठीच्या निवासस्थानाचे  वेगळे दर आहेत. संघटनांकडे उत्पन्नांचे फारसे स्रोत नसतात. त्यामुळे स्पर्धा  कशा आयोजित कराव्या हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो.

क्रीडा प्रशिक्षकांच्या रोजीरोटीचा प्रश्नउल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनामुळे अनेक क्रीडा शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातच खेळाडूही सरावासाठी क्रीडा संकुलात येत नसल्यामुळे प्रशिक्षकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादboxingबॉक्सिंगShootingगोळीबार