शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विद्यापीठ परिसरात कडक नियम; विनापरवानगी फोटो, शूटिंग करणाऱ्यांना २ हजारांचा दंड

By योगेश पायघन | Updated: January 3, 2023 12:14 IST

विद्यापीठ सुरक्षा समितीची बैठक: १८ निर्णयांच्या अंमलबजावणीला सुरुवात

औरंगाबाद : विद्यापीठात वाहनांची वेगमर्यादा २० किमी प्रति तासावर नसेल, याकडे सुरक्षा रक्षकांनी लक्ष द्यावे. प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग केल्यास २ हजार रु. दंड आणि विद्यापीठ परिसरात वाहन शिकवण्यासाठी दुचाकी, चारचाकी आढळून आल्यास ३ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच विनापरवानगी उपोषण, आंदोलन, मोर्चे काढता येणार नसल्याचा निर्णय विद्यापीठाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात सात सदस्सीय बैठक पार पडली. यात १८ निर्णय घेण्यात आले. समिती अध्यक्ष कुलसचिव भगवान साखळे, सचिव उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे, डॉ. मुस्तजीब खान, डाॅ. कैलास पाथ्रीकर, डाॅ. पुरषोत्तम देशमुख व सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनास पूर्वपरवानगी लागेल. उपोषण, मोर्चे आंदोलनाला पोलिसांची परवानगी बंधनकारक राहील. कुलगुरू कार्यालयात आंदोलकांना परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे ठरले. आंदोलनांच्या परवानगीसाठी कुलसचिवांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. परिसरातील फुले तोडण्यास मनाई करण्यात आली. मोकाट जनावरांचा बंदोबस्त. विद्यापीठ प्रवेशद्वारापासून ते विधी विभागापर्यंत मुख्य रस्त्यावर गरजेनुसार गतिरोधक, बारा ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून अंमलबजावणीला सोमवारपासून सुरुवात झाल्याचे कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी सांगितले.

हे आहेत निर्णय: -वाहनांची वेगमर्यादा २० किमी प्रति तास राहील याकडे लक्ष देणे-हाॅर्न प्रतिबंध, धूम्रपानावर बंदी पालनाकडे लक्ष देणे, फलक लावणे-विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग २ हजार दंड-अनुचित प्रकार, दुर्घटना, मदतीवेळी संपर्कासाठी सुरक्षा रक्षकांचा संपर्क क्रमांक फलक लावणे-परिसरात वाहन चालवणे शिकण्यास प्रतिबंध, ३ हजार दंड-स्नेक कॅचरची व्यवस्था व सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक दर्शनी ठिकाणी लावणे-कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सुरक्षारक्षकांना बायोमॅट्रिक हजेरी, ड्रेसकोड, ओळखपत्र बंधनकारक-सकाळी ६ ते ९ पायी चालणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वाहनांना विद्यापीठ गेटवर डाव्या बाजूने वाहनतळ करणे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद