शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई

By admin | Updated: July 29, 2015 00:50 IST

बीड : ध्वनी प्रदूषण, रस्त्यावर विनापरवाना तात्पुरत्या स्वरूपातील मंडप उभारणी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल

बीड : ध्वनी प्रदूषण, रस्त्यावर विनापरवाना तात्पुरत्या स्वरूपातील मंडप उभारणी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, पुरवठा अधिकारी भाऊसाहेब जाधव यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व पोलीस प्रशासनाने ध्वनी प्रदुषणाविषयीच्या तरतुदींची काटेकोर पालन करावे, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या तक्रारी नोंदवून घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाने पोलीस विभागाचा १०० हा टोल फ्री क्रमांक निश्चित केल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नागरी क्षेत्र वगळता घोषित करण्यात आलेल्या शांतता क्षेत्राची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शांतता क्षेत्राची माहिती नगरपालिकांतर्फे देण्यात येणार आहे. पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांना ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची अधिसूचनाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)