शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:17 IST

ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरणांतून जायकवाडी धरणात तात्काळ पाणी सोडावे आणि मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी परभणीतील शेतकºयांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्दे वरच्या धरणांतून पाणी सोडा : पाणी कपातीचा निर्णय रद्द करा, परभणी जिल्ह्याला आवर्तने सोडण्याची मागणी

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरणांतून जायकवाडी धरणात तात्काळ पाणी सोडावे आणि मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी परभणीतील शेतकºयांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.अखिल भारतीय किसान सभा परभणी जिल्हा कमिटीतर्फे हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विलास बाबर, लिंबाजी कचरे, लक्ष्मीकांत साकुडकर, दीपक लिपणे, गोपाळ कुलकर्णी, रामकिशन खवळे, अनंतराव कच्छवे, अंकुश तवर, सुदामराव आंधळे, मुंजाजी काळे, रामप्रसाद कदम यांच्यासह तीस ते चाळीस शेतकरी आणि कामगारांंची उपस्थिती होती.२०१४ पासून परभणी जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळात होरपून निघत आहे. जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला सिंचनासाठी मिळणाºया ४२० दलघमी पाण्याची कपात करून शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. १२ सप्टेंबर रोजी पाणी वाटपाचे फेरनियोजन करून शेतकºयांच्या सिंचनाचे पाणी कपात करून बीअर कंपन्यांच्या घशात पाणी घालण्याचा डाव आखल्याचा संताप यावेळी शेतकºयांनी व्यक्त केला. हा निर्णय रद्द करून परभणी जिल्ह्याला रबीसाठी चार पाणी पाळ्या आणि उन्हाळ्यात जनावरांच्या चाºयासाठी, पिण्यासाठी दोन आवर्तने सोडण्याची आग्रही मागणी शेतकºयांनी केली.जवळपास दोन तास शेतकºयांनी ठिय्या आंदोलन केले. सत्यता पडताळल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शेतकºयांना देण्यात आले.बीअर कंपन्यांना पाणी देणे बंद कराजायकवाडी धरणासाठी सोडावे लागणारे पाणी नगर, नाशिक जिल्ह्यात अडवून धरल्याविषयी शेतकºयांनी संताप व्यक्त केला. या दोन जिल्ह्यांत बेकायदेशीररीत्या पाणी अडवले जाणार नाही, याचा बंदोबस्त करून पाणी जलाशयात सोडण्याची तरतूद करावी. मराठवाड्याच्या लाभक्षेत्रातील कालवे दुरुस्त करून पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. दुष्काळाच्या नावाखाली पाणी आरक्षित करून बीअर कंपन्यांना पाणी देणे बंद करण्याची मागणीही करण्यात आली.

टॅग्स :WaterपाणीFarmer strikeशेतकरी संप